नवी मालिका 'जुळली गाठ गं' प्रेक्षकांच्या भेटीस, अभिनेत्री म्हणाली, "लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:36 IST2024-12-11T17:35:43+5:302024-12-11T17:36:21+5:30

लवकरच 'जुळली गाठ गं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Payal Memane New Serial Julali Gath G Coming Soon On Sun Marathi Watch Promo | नवी मालिका 'जुळली गाठ गं' प्रेक्षकांच्या भेटीस, अभिनेत्री म्हणाली, "लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर..."

नवी मालिका 'जुळली गाठ गं' प्रेक्षकांच्या भेटीस, अभिनेत्री म्हणाली, "लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर..."

'सन मराठी' वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अव्वल ठरली आहे. 'सन मराठी'ने नेहमीच वेगवेगळ्या कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. अशातच एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. लवकरच 'सन मराठी'वर 'जुळली गाठ गं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'जुळली गाठ गं' या मालिकेचा एक टीझरही समोर आला आहे. सोशल मिडियावर या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. यामध्ये अभिनेत्री पायल मेमाणे 'सावी' ही व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहे.

 मालिकेतील मुख्य भूमिकेबद्दल व्यक्त होत पायल म्हणाली, "सन मराठी' या वाहिनीच्या सगळ्यांच मालिका प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत आणि आता मी सुद्धा 'सन मराठी'वर काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. 'जुळली गाठ गं' या मालिकेसाठी मला प्रॉडक्शनमधून कॉल आला. ऑडिशन, लुकटेस्ट या पद्धतीनेच माझं सिलेक्शन झालं. या मालिकेत मी सावी हे मुख्य पात्र साकारत आहे. जेव्हा मला सावीच्या स्वभावाबद्दल समजलं तेव्हा मी तिच्या प्रेमातच पडली. सावी ही इन्फ्लुएन्सर आहे. कोल्हापूरमधील सगळ्याच चविष्ट पदार्थांचं ती व्हिडीओ करून युट्युबवर अपलोड करते. बिनधास्त, मनमोकळी, अन्याय सहन न करणारी असा सावीचा स्वभाव आहे". 


पुढे ती म्हणाली, "मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलच पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात त्या पुढे पोहचल्या पाहिजेत. लग्नानंतर मुलींचं आयुष्य बदलतं. पण, स्त्रियांना बंधनात न अडकवता त्यांना मोकळीक दिली पाहिजे. खेड्यागावात अजूनही लग्नानंतर स्त्रिया फक्त घरातलीच काम करतात. पण असं नाही झालं पाहिजे. लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर खऱ्या अर्थाने सुरु होत. ही मालिका याच विषयावर आधारित आहे".

पायल म्हणाली, "जसं सावीला तिच्या घरी जितकी मोकळीक दिली गेलीये तशीच मोकळीक तिला सासरी मिळेल का? सावी सासरच्या मंडळींचे विचार बदलू शकेल का? सावीची गाठ कोणाबरोबर जुळेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. मालिकेच कथानक खूप सुंदर आहे. त्यामुळे लगेचच मालिकेसाठी होकार दिला. मी मूळची पुण्याची आहे. माझ्यासाठी कोल्हापुरी भाषा शिकणं हा टास्क होता. पण मला प्रॉडक्शनने यासाठी खूप मदत केली. सावी  या भूमिकेमुळे मी फूड वलॉगिंग शिकली. या पुढे मलाही सावीचा पुढचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. लग्नानंतर सावीच आयुष्य कसं बदलेल हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे".

Web Title: Payal Memane New Serial Julali Gath G Coming Soon On Sun Marathi Watch Promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.