​पेशवा बाजीराव घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 10:08 AM2017-08-07T10:08:38+5:302017-08-07T15:38:55+5:30

बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित बाजीराव मस्तानी हा संजय लीला भन्सालीने दिग्दर्शित केलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या ...

Peshwa Bajirao to listen to the audience? | ​पेशवा बाजीराव घेणार प्रेक्षकांचा निरोप?

​पेशवा बाजीराव घेणार प्रेक्षकांचा निरोप?

googlenewsNext
जीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित बाजीराव मस्तानी हा संजय लीला भन्सालीने दिग्दर्शित केलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील दिपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंह यांच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी कौतुक केले होते. 
बाजीराव पेशवा या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित पेशवा बाजीराव ही मालिका पाहायला मिळत आहे. या मालिकेत सुरुवातीला बाजीराव पेशव्यांचे बालपण पाहायला मिळाले होते. या मालिकेने नुकताच काही वर्षांचा लीप घेतला आहे. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. 
बाजीराव पेशव्यांचे आयुष्य हे खूपच रोमांचकारी होते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार अशी या मालिकेच्या फॅन्सना खात्री होती. पण या मालिकेचे चित्रीकरण लवकरात लवकर संपवून ही मालिका पुढील महिन्याभरात संपणार असल्याचे म्हटले जात आहे. ही मालिका काहीच दिवसांत संपणार असल्याने या मालिकेच्या कथानकावर सध्या काम देखील सुरू असल्याचे म्हटले जात आहे. 
पेशवा बाजीराव या मालिकेत नुकतेच बाजीराव यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. यानंतर मालिकेचे कथानक संपूर्ण पेशव्यांच्या कारकिर्दीभोवती फिरणार होते. त्यामुळे ही मालिका येवढ्या लवकर कशी संपू शकते हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे.
पेशवा बाजीराव ही मालिका खरंच प्रेक्षकांचा निरोप घेणार की ही एक अफवा आहे हे आपल्याला लवकरच कळेल. याबाबत अद्याप तरी सोनी वाहिनीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Web Title: Peshwa Bajirao to listen to the audience?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.