'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 06:50 PM2023-05-15T18:50:50+5:302023-05-15T18:51:27+5:30

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र तरीदेखील या मालिकेतील कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

Phulala Sugandh Maticha fame actor get engaged | 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला साखरपुडा

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला साखरपुडा

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र तरीदेखील या मालिकेतील कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेत तुषारची भूमिका अभिनेता आकाश पाटीलने साकारली होती. आकाश पाटील हा चित्रपट, मालिका अभिनेता आहे. फुलाला सुगंध मातीचा मालिकेमुळे आकाश प्रकाशझोतात आला. नुकताच आकाश पाटीलचा शमिका साळवी सोबत साखरपुडा पार पडला.

आकाशने त्याच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करत त्या क्षणाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे सेलिब्रिटींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील त्याची सहकलाकार समृद्धी केळकर हिनेही आवर्जून हजेरी लावली होती. 

आकाश पाटील बद्दल सांगायचे तर तो एक उत्तम अभिनेता आहे. टकाटक या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यात तो सहाय्यक भूमिकेत दिसला होता. एबी आणि सीडी, हृदयी वसंत फुलताना या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमुळे आकाश दोन वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. या मालिकेत तो पुढे नकारात्मक भूमिकेत दिसला.

मालिकेतून ब्रेक घेऊन तो सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत चेतनची भूमिका साकारताना दिसला होता. चेतनच्या एंट्रीने मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली होती. या मालिकेनंतर आकाश सध्या तरी कोणता प्रोजेक्ट करत नाहीये. पण त्याच्या साखरपुड्याच्या बातमीने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Web Title: Phulala Sugandh Maticha fame actor get engaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.