हेच बाकी होतं...; ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्रीनं अशी केली वटपौर्णिमेची पूजा, झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:14 PM2022-06-14T17:14:12+5:302022-06-14T17:28:01+5:30
Phulala Sungandh Maticha :‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री मधुरा जोशी हिने वटपौर्णिमेचं व्रत केलं. पण अगदी मॉडर्न स्टाईलनं. काहींना तिची ही मॉडर्न स्टाईल आवडली आहे तर काहींनी यावरून तिला ट्रोल केलं आहे.
आज वटपौर्णिमा. जन्मोजन्मी हाच पती मिळू दे... आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, यासाठी सगळ्या विवाहिता आजच्या दिवशी वडाची पूजा करतात. दिवसभर उपवास करतात. अनेक मराठी अभिनेत्री सुद्धा हे व्रत मनोभावे करतात. ‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sungandh Maticha) फेम अभिनेत्री मधुरा जोशी (Madhura Joshi) हिनेही वटपौर्णिमेचं व्रत केलं. पण अगदी मॉडर्न स्टाईलनं. काहींना तिची ही मॉडर्न स्टाईल आवडली आहे तर काहींनी यावरून तिला ट्रोल केलं आहे.
मधुरा जोशी सध्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आज वटपौर्णिमा म्हटल्यावर पूजा करुन तिला शुटींगला पळायाचं होतं. वेळ कमी होता. मग काय, मधुरानं कुठेही बाहेर न जाता थेट फोनवर वडाच्या झाडाचं फोटो काढला आणि त्याच झाडाच्या फोटोलाच सात फेरे मारलेत.
मधुरानं शेअर केलेल्या फोटोमध्ये एका मोबाईल स्टँडला स्मॉर्टफोन ठेवला आहे. फोनवर वडाच्या झाडाचा फोटो दिसत आहे. मधुरानं फोनवर असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करत थेट फोनलाचा धागा गुंडाळला आहे. मधुरानं तिच्या नवऱ्याबरोबरचा या वटपौर्णिमेचा फोटो शेअर केला. तो फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
काहींना मधुराची ही आयडिया क्रिएटीव्ह असल्याचं म्हटलं आहे. काहींनी मात्र यावरून तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. आता एवढंच बघायचं बाकी होतं, अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली. अडाणी कलाकार लोक, अशा शब्दांत एका युजरनं तिला ट्रोल केलं. लाज वाटली पाहिले असले फालतु स्टंट करताना. करायची नसेल पूजा तर करू नका, पण त्याची टिंगल करणं सोडा, अशा शब्दांत एका युजरनं आपला संताप व्यक्त केला.
अभिनेत्री मधुरा जोशी ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत कितीर्ची थाकटी जाऊ इमलीची भूमिका साकारत आहेत. याआधी मधुरा आपल्याला पुण्यश्लोक अहिल्याबाईमध्ये रेणूच्या भूमिकेत दिसली होती. मधुरा पेशानं सायकोलॉजिस्ट आहे.
ट्रोलर्सला दिलं उत्तर
वटपौर्णिमेच्या पूजेवरून ट्रोल करणाऱ्यांना मधुरानं उत्तरही दिलं आहे. माझ्या या पोस्टवर कमेंट करणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की, मी माझ्या प्रिय पतीसाठी ही पूजा केली. माझ्याकडे वेळ नव्हता. माझ्या मते, व्रतवैकल्यं मनापासून करणं महत्त्वाचं. जे हे समजू शकत नाही, त्यांनी माझ्या या पोस्टकडे दुर्लक्ष करावं, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.