वक्तृत्व स्पर्धेत वल्लरी बाजी मारणार का? 'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका रोमांचक वळणावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:25 PM2024-12-04T15:25:13+5:302024-12-04T15:25:32+5:30
'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. गावावरुन वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी वल्लरी मुंबईत आली आहे. फसवणूक झाल्यानंतर कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवलेल्या वल्लरीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
कलर्स मराठीवर काही दिवसांपूर्वीच 'पिंगा ग पोरी पिंगा' ही नवी मालिका सुरू झाली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ५ भिन्न स्वभावाच्या महिलांच्या मैत्रीची गोष्ट या मालिकेतून दाखविण्यात येत आहे. 'पिंगा ग पोरी पिंगा' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. गावावरुन वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी वल्लरी मुंबईत आली आहे. फसवणूक झाल्यानंतर कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवलेल्या वल्लरीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
वल्लरीला कॉलेजमधील फाडफाड इंग्रजी डोक्यावरुन जात आहे. त्यामुळे तिने प्रोसेसरला मराठी भाषेतून वकिली शिकवण्याची विनंती केली आहे. त्यावर त्या सरांनी कॉलेजमध्ये पार पडत असलेल्या इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत वल्लरीने जर पहिला क्रमांक पटकावला तर तिला मराठी भाषेतून शिकवू असं सांगितलं आहे. त्यामुळे दिवसरात्र एक करुन वल्लरी वक्तृत्व स्पर्धेची तयारी करताना दिसून आली आहे. अशातच श्वेताने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याने वल्लरीला वक्तृत्व स्पर्धेला पोहोचायला उशीर होता. आता अनेक अडथळे पार केलेली वल्लरी वक्तृत्व स्पर्धेत बाजी मारणार का? हे पाहणं रंजनकारक असणार आहे.
'पिंगा ग पोरी पिंगा' मालिकेत ऐश्वर्या शेटे, विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. वैभव चिंचाळकर या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. संध्याकाळी ७.३० वाजता या मालिकेचं प्रसारण कलर्स मराठीवर केलं जातं.