पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्याच्या लेकीचा थाटात पार पडला बारसा, त्याची पत्नी आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 04:19 PM2023-03-29T16:19:41+5:302023-03-29T16:30:39+5:30

फोटोंमध्ये आई-बाबा झाल्याचा आनंद अभिनेता आणि अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणं दिसतो आहे.

Pinkicha vijay aso fame actor vijay andalkar and rupali zankar daughter naming ceremony | पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्याच्या लेकीचा थाटात पार पडला बारसा, त्याची पत्नी आहे अभिनेत्री

पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्याच्या लेकीचा थाटात पार पडला बारसा, त्याची पत्नी आहे अभिनेत्री

googlenewsNext

पिंकीचा विजय असो’( Pinki Cha Vijay Aso) मालिकेत युवराजची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकर काही दिवसांपूर्वी बाबा झाला आहे.  विजयनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. विजयनं स बाप झालो..लक्ष्मी घरी आली रे..अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी अभिनंदनचा वर्षाव केला होता. अभिनेत्याची लेक आता दोन महिन्यांची झाली आहे. नुकतंच तिचं बारसं करत झालं. ज्याचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 विजयच्या आणि रुपालीच्या लेकीच बारसा मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. दोघांनी फोटो शेअर करत लेकीचं नाव सांगितलं आहे. लेकीचं नाव मायरा असं ठेवलं आहे. मायरा हे नाव सध्या मुलींच्या नावांच्या यादीत ट्रेडिंग आहे. लेकीसोबतचे तीन फोटो विजयनं शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विजय आणि रुपालीच्या चेहऱ्यावर आई-बाबा झाल्याचा आनंद स्पष्टपणं दिसतो आहे.

विजयची पत्नी रुपाली सुद्धा अभिनेत्री आहे. रुपाली  आणि विजयची भेट झी मराठीवरील ‘लग्नाची वाइफ वेड्डिंगची बायकू’ या मालिकेच्या सेटवर झाली. यात रुपालीनं काजोलची तर विजयनं मदनची भूमिका साकरली होती. विजय आंदळकरने वर्तुळ, स्वराज्यरक्षक संभाजी, बाजीराव मस्तानी, 702 दीक्षित, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, गोठ, प्रेमा तुझा रंग कसा या चित्रपट आणि मालिकेतून तो महत्वाच्या भूमिका साकारताना दिसला होता. 
 

Web Title: Pinkicha vijay aso fame actor vijay andalkar and rupali zankar daughter naming ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.