'पिंकीचा विजय असो' फेम आरती मोरेच्या बहिणीला पाहिलंत का? वाढदिवशी शेअर केल्या खास आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:26 IST2025-02-20T15:24:35+5:302025-02-20T15:26:56+5:30
"तूझ्या इतकं निस्वार्थी...", मराठमोळ्या अभिनेत्रीची बहिणीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

'पिंकीचा विजय असो' फेम आरती मोरेच्या बहिणीला पाहिलंत का? वाढदिवशी शेअर केल्या खास आठवणी
Arti More : आरती मोरे (Arti More) ही मराठी कलाविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्री आहे. 'पिकींचा विजय असो' या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेल्या पिंकी या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बऱ्याच मालिका, नाटक, चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही तिने काम केलं आहे. आरती मोरेने सोशल मीडियावर नुकतीच एका खास व्यक्तीसाठी पोस्ट केली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
नुकतीच आरती मोरेने तिच्या लाडक्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय, "माझ्या आयुष्यात अनेक सक्षम महिला आजुबाजूला आहेत. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ब्रेव्ह लेडी..., आणि मला तुझा अभिमान सुद्धा वाटतो. एखाद्याला मदत करायची असेल तू अगदी निस्वार्थपणे त्याची मदत करतेस. दवाखान्यात रात्रंदिवस काम करूनही तुझ्या मनात अनेक विचार चालू असतात. घरी सुद्धा तू प्रत्येकाच्या मदतीला धावून येतेस त्यांची काळजी घेतेस. आय लव्ह यू...! मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या इतकं निस्वार्थी जगता यायला हवं...", असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आरतीच्या या पोस्टवर रिप्लाय करत बहीणीने लिहिलंय, "थॅक्यू सो मच...! मी स्ट्रॉंग आहेच पण तू माझ्याहीपेक्षा स्ट्रॉंग आहेस."
वर्कफ्रंट
अभिनेत्री आरती मोरे 'जय मल्हार', 'अस्मिता',' दिल दोस्ती दोबारा','गुलमोहर' या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली. 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकातली तिची भूमिका प्रचंड गाजली.