काशी विश्वनाथ मंदिरात गेल्यावर एल्विश यादवला 'ती' चूक भोवली! तक्रार दाखल; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:37 AM2024-07-26T10:37:10+5:302024-07-26T10:37:38+5:30

एल्विश यादव नुकताच काशी विश्वनाथ मंदिरात गेला होता. पण त्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. असं काय घडलं? (elvish yadav)

Police Complaint Filed Against Elvish Yadav For Taking Photos At Kashi Vishwanath Temple varansi | काशी विश्वनाथ मंदिरात गेल्यावर एल्विश यादवला 'ती' चूक भोवली! तक्रार दाखल; नेमकं काय घडलं?

काशी विश्वनाथ मंदिरात गेल्यावर एल्विश यादवला 'ती' चूक भोवली! तक्रार दाखल; नेमकं काय घडलं?

'बिग बॉस ओटीटी २'चा विजेता एल्विश यादव हा कायमच कोणत्या ना कोणत्या वादात सापडलेला दिसतो. कधी पार्टीत सापाचं विष पुरवठा प्रकरण असो, कधी सार्वजनिक स्थळी झालेली मारामारी असो एल्विश विविध कारणांमुळे वादात सापडतो. अशातच एल्विश आणखी एका नव्या वादात सापडला आहे. एल्विशने नुकतंच काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. मंदिर परिसरात केलेल्या एका चुकीमुळे एल्विशविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

एल्विशची एक चूक आणि तक्रार दाखल

एल्विशने नुकतीच काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. तिथे गेल्यावर मंदिर परिसरात फोटो काढल्याचा आरोप एल्विशवर लावला गेला. यामुळे वाराणसी उपायुक्तांकडे याविरोधात तक्रार नोंदवली गेली. प्रताप कुमार सिंह या वकीलाने एल्विशविरोधात ही तक्रार दाखल केलीय. प्रताप कुमार यांनी तक्रारीत म्हटलंय की, "एल्विशने काशी विश्वनाथ मंदिर परिसरात फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. काशी विश्वनाथ मंदिर परिसरात मोबाईलच्या वापराला सक्त मनाई आहे. यामुळे मंदिर प्रशासनावर शंका उपस्थित केली जात आहे."

एल्विशचे फोटो व्हायरल झाल्याने मंदिर सुरक्षेवर बोट

या तक्रारीच्या पत्रात पुढे लिहिण्यात आलंय की, "प्रतिबंधीत क्षेत्रात वारंवार होत असणाऱ्या कॅमेराच्या वापरामुळे भाविकांंच्या भावनांचा ठेच पोहोचण्याची शक्यता आहे. मंदिर प्रशासनाच्या नियमांचं हे उल्लंघन आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी." अशी विनंती या तक्रारीत केलेली दिसतेय. अशाप्रकारे काशी विश्वनाथ मंदिर परिसरात फोटो काढल्याने एल्विशविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. यावर पोलीस काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

Web Title: Police Complaint Filed Against Elvish Yadav For Taking Photos At Kashi Vishwanath Temple varansi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.