Sheezan Khan Secret Girlfriend: शीजानची 'ती' सीक्रेट गर्लफ्रेंड कोण? अन् तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात तिची भूमिका काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:29 IST2022-12-26T17:28:25+5:302022-12-26T17:29:38+5:30
Sheezan Khan Secret Girlfriend: तुनिषा शर्मा हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आता शीजान खानची ती सीक्रेट गर्लफ्रेंड कोण आहे याचाही तपास करण्यास सुरुवात केली आहे.

Sheezan Khan Secret Girlfriend: शीजानची 'ती' सीक्रेट गर्लफ्रेंड कोण? अन् तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात तिची भूमिका काय?
Sheezan Khan Secret Girlfriend: तुनिषा शर्मा हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आता शीजान खानची ती सीक्रेट गर्लफ्रेंड कोण आहे याचाही तपास करण्यास सुरुवात केली आहे. शीजाननं आपल्या मुलीला फसवल्याचा आरोप तुनिषाच्या आईनं केला आहे. शीजान आधीपासूनच एका मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होता तरीही त्यानं माझ्या मुलीला फसवलं असा आरोप तुनिषाच्या आईनं केला आहे.
आता या प्रकरणात पोलिसांनी शीजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचा शोध सुरू केला आहे, ज्याचा उल्लेख तुनिषाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तुनिषाच्या आत्महत्येत शीजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडची नेमकी भूमिका काय? या प्रश्नाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तुनिषाचे त्या मुलीशी कधी संभाषण झाले होते का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
शीजानच्या कथित गर्लफ्रेंडबाबत तुनिषाला कुणी सांगितलं?
शीजानच्या कथिक गर्लफ्रेंडबाबत तुनिषाला कुणी माहिती दिली? शीजननेच याची माहिती दिली का? असेही काही प्रश्न उपस्थित झाली आहेत आणि याची उत्तरं जाणून घेण्यासाठी सध्या पोलीस शीजनच्या सीक्रेट गर्लफ्रेंडचा शोध घेत आहेत. तुनिषाला काही दिवसांपूर्वीच त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल माहिती मिळाली आणि ती खूप दु:खी झाली होती. तुनिषा यामुळेच खूप तणावात होती आणि तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं असा आरोप तुनिषाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शीजानचा मोठा दावा
या सगळ्यात पोलीस कोठडीत असणाऱ्या शीजानने तुनिषाबाबत मोठा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी तुनिषाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे शीजानचे म्हणणे आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शीजाननं सांगितलं की, याआधीही तुनिषानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्याने तुनिषाला वाचवलं होतं. तुनिषाची आई वनिता शर्मा यांनाही याबाबत काळजी घेण्यास सांगितलं होतं, असंही तो चौकशीत म्हणाला आहे.