करिष्मा तन्ना की पूजा बोस- ‘हर मर्द का दर्द’मध्ये नवी अप्सरा कोण असेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2017 10:08 AM2017-05-04T10:08:37+5:302017-05-04T15:38:37+5:30
एखादा खलनायक किंवा नकारात्मक स्वभावछटा असलेल्या व्यक्तिरेखेशिवाय कोणतीही मालिका किंवा कार्यक्रम पूर्ण होत नाही. ‘लाईफ ओके’वरील ‘हर मर्द का ...
ए ादा खलनायक किंवा नकारात्मक स्वभावछटा असलेल्या व्यक्तिरेखेशिवाय कोणतीही मालिका किंवा कार्यक्रम पूर्ण होत नाही. ‘लाईफ ओके’वरील ‘हर मर्द का दर्द’ या मालिकेतही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता अप्सरेच्या रूपात एखाद्या खलप्रवृत्तीची व्यक्तिरेखा या मालिकेत समाविष्ट करण्याची निर्मात्यांची योजना आहे. या व्यक्तिरेखेद्वारे मालिकेत आता नवा कलाकार येणार असल्याने ही कलाकार कोण असेल, याची चर्चा सुरू झाली आहे. आता या नकारात्मक स्वभावछटेच्या अप्सरेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी पूजा बोस आणि करिष्मा तन्ना या दोन अभिनेत्रींशी संपर्क साधला आहे. आता या नव्या खलनायिका अप्सरेच्या भूमिकेसाठी या दोन अभिनेत्रींपैकीच एकीची निवड करण्यात येणार आहे. ही नवी अप्सरा सध्याच्या मानसी या अप्सरेच्या विरोधात असेल. सूत्रांनी सांगितले, “निर्मात्यांनी आता मालिकेत एक गडद स्वभावछटा असलेली अप्सरा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या भूमिकेसाठी निर्मात्यांच्या मनात दोन सुयोग्य अभिनेत्रींचा पर्याय मूळ धरीत आहे. त्यासाठी त्यांनी करिष्मा तन्ना आणि पूजा बोस या दोन अभिनेत्रींची निवड केली आहे. नव्या अप्सरेची भूमिका या दोघींपैकीच एकीला मिळणार असली, तरी ती अभिनेत्री कोण, हे अद्याप ठरायचं आहे.”
काही दिवसांपूर्वीच पूजा बॅनर्जीने या मालिकेत एंट्री केल्याचे पाहायला मिळाले. खरे तर तिला कित्येक दिवसांपासून विनोदी किंवा खलनायिकेची भूमिका साकारण्याची इच्छा होती. या मालिकेतील भूमिकेला दोन्ही छटा असल्याने तिने या मालिकेत भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला होता.या मालिकेचे दिग्दर्शन परमीत सेठी करत असून यात फैसल रशिद प्रमुख भूमिकेत आहे.