प्रेमाची व्याख्या माहीत आहे कोणाला ? या मराठमोळ्या अभिनेत्रीने चाहत्यांना केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 12:23 PM2021-02-12T12:23:44+5:302021-02-12T12:25:21+5:30
व्हॅलेंटाइन डे देशभरात जल्लोषात साजरा केला जातो.
मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन डे देशभरात जल्लोषात साजरा केला जातो. व्हॅलेंटाइन डेच्या आधी प्रेमाची व्याख्या ...... माहीत आहे कोणाला ? असा प्रश्न मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवर विचारला आहे. चाहत्यांनी ही पूजाच्या या प्रश्नाला कमेंट करत उत्तर दिले आहे. हा प्रश्न विचारताना पूजाने स्वत:चा समुद्र किनारी उभा असलेला फोटो शेअर केला आहे.
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सर'मध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे.
'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली.