'अग्निफेरा'च्या सेटवर या कलाकारांमध्ये रंगते पूल टूर्नामेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 05:46 AM2018-04-23T05:46:29+5:302018-04-23T11:16:29+5:30
&TV वरील अग्निफेराच्या सुप्रसिद्ध लव्ह स्टोरीचे वर्णन करायचे झाल्यास वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीची हे दोनच शब्द योग्य आहेत. पडद्यावर ही ...
&TV वरील अग्निफेराच्या सुप्रसिद्ध लव्ह स्टोरीचे वर्णन करायचे झाल्यास वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीची हे दोनच शब्द योग्य आहेत. पडद्यावर ही कथा जितकी गुंतागुंतीची वाटते तितकेच सेटवरील वातावरण मात्र मजेशीर आणि आरामदायी असते. सध्या या मालिकेच्या कलाकारांमध्ये चित्रीकरणादरम्यान बरीच प्रसिद्ध असलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूल टेबल. अंकित गेरा ऊर्फ अनुराग या सगळ्या कलाकारांचा मार्गदर्शक बनला आहे.
मालिकांचे चित्रीकरण म्हटले की कलाकारांना त्यांच्या दिवसातील १२ तासांहून अधिक वेळ यासाठी द्यावा लागतो. त्यामुळे ते त्यांच्या घरापेक्षाही अधिक वेळ हे मालिकेच्या सेटवर घालवतात. अनेकवेळा मालिकेच्या टीममधील कलाकार हे एखाद्या कुटुंबाप्रमाणेच बनते. चित्रीकरणाच्या दरम्यान असलेल्या फावल्या वेळात तर हे कलाकार मजा मस्ती करताना देखील दिसतात. 'अग्निफेरा' या मालिकेच्या सेटवर तर सगळे कलाकार फावल्या वेळात खेळताना दिसतात. चित्रीकरणाच्या दरम्यान मिळालेल्या वेळामध्ये या मालिकेचा नायक अंकित गेरा, मालिकेच्या नायिका युक्ती कपूर (रागिणी) आणि सिमरन कौर (सृष्टी) यांना पूल कसे खेळायचे ते शिकवतो. तसेच जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अयाज अहमद (बैजुभय्या) देखील या गॅंगमध्ये सामील होतो. काही वेळासाठी का होईना, कलाकारांना आराम वाटावा आणि जरा मजा करता यावी यासाठी या खेळाचा योग्य उपयोग सेटवर होतो आहे. सतत १२-१३ तासांकरता शूटिंग करून दमलेल्या या कलाकारांना या खेळातून आराम मिळतो असे ते सांगतात. आपल्याला मिळत असलेल्या ब्रेकचा कलाकार अतिशय योग्यरित्या वापर करत असल्याचे म्हणावे लागेल.
सेटवर सर्वांनाच व्यग्र ठेवणाऱ्या या नव्या खेळाबद्दल आम्ही अंकितला विचारले असता त्याने सांगितले, “सेटवर खेळायला खूप मजा येते आहे, आम्ही या मालिकेत नायिकांनाही हा खेळ शिकवत आहोत आणि लवकरच सेटवर आता टूर्नामेंट सुरू होतील असे वाटते आहे. प्रत्येकजण हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक प्रकारे तणाव दूर करणारा खेळ आहे. हे म्हणजे सर्व कुटुंब एका घरात जमून गप्पागोष्टी आणि मजा करत असल्यासारखेच आहे.”
Also Read : अंकित गेरा आणि युक्ती कपूर दिसले संजय दत्त आणि नगमाच्या भूमिकेत