पत्रकार पोपटलालने परदेशी चित्रपटात केलाय अभिनय, 'तारक मेहता'मधून मिळाली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:07 PM2022-03-03T18:07:25+5:302022-03-03T18:07:33+5:30

पत्रकार पोपटलाल म्हणजेच शाम पाठक टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

Popatlal of taarak mehta ka ooltah chashmah acted in movies, shyam pathak acting career | पत्रकार पोपटलालने परदेशी चित्रपटात केलाय अभिनय, 'तारक मेहता'मधून मिळाली ओळख

पत्रकार पोपटलालने परदेशी चित्रपटात केलाय अभिनय, 'तारक मेहता'मधून मिळाली ओळख

googlenewsNext

मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरात नाव कमावले आहे. या मालिकेतील पत्रकार पोपटलालच्या व्यक्तिरेखेची लोकप्रियताही एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. पोपटलालची भूमिका साकारणारा शाम पाठकने(Shyam Pathak) आपल्या अभिनयाने लाखोंची मने जिंकली आहेत. शाम पाठक हा टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे, परंतु त्याने मालिकांमध्ये येण्यापूर्वी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.

परदेशी चित्रपाट केले काम
विशेष म्हणजे, पत्रकार पोपटलाल म्हणजेच शाम पाठकने परदेशी चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. शाम पाठक बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'लस्ट कॉशन'(Lust Caution) या चित्रपटात काम केले आहे. हा एक चिनी चित्रपट आहे, ज्यामध्ये शाम पाठकने ज्वेलरी दुकानदाराची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील पोपटलालचे अस्खलित इंग्रजी प्रेक्षकांना भुरळ पाडते. 

अनेक मालिकांमध्ये अभिनय
शाम पाठकने परदेशी चित्रपटासह 'सुख बाय चान्स', 'जसुबेन जयंतीलाल...', 'जस्सी जैसी कोई नहीं' या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. पण, पोपटलाला खरी ओळख 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने मिळाली. आज प्रत्येकजण श्याम पाठलका पत्रकार पोपटलाल म्हणून ओळखतो. मालिकेत पोपटलालचे पात्र अविवाहीत दाखवले आहे, पण खऱ्या आयुष्यात शाम पाठक विवाहित असून, त्याला तीन मुले आहेत. 

Web Title: Popatlal of taarak mehta ka ooltah chashmah acted in movies, shyam pathak acting career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.