Indian Idol Marathiचं सूत्रसंचालन करताना स्वानंदी टिकेकरच्या जागी दिसणार ही लोकप्रिय अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 14:14 IST2022-01-18T14:13:08+5:302022-01-18T14:14:19+5:30
इंडिया आयडॉल मराठी (Indian Idol Marathi) या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (swanandi tikekar) करत होती.

Indian Idol Marathiचं सूत्रसंचालन करताना स्वानंदी टिकेकरच्या जागी दिसणार ही लोकप्रिय अभिनेत्री
सोनी मराठीवरील लोकप्रिय मराठी सिंगिग रिएलिटी शो ‘इंडिया आयडॉल मराठी’ (Indian Idol Marathi) चे सूत्रसंचालन मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) दिसते आहे. मात्र आता यात बदल झालेला पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर या शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसणार नाही आहे. तिच्या जागी या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप वाहिनीकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वानंदी टिकेकरच्या जागी या आठवड्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी इंडिया आयडॉल मराठी या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यामुळे प्राजक्ताचे चाहते देखील तिला हा शो होस्ट करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्राजक्ताला यापूर्वी सूत्रसंचालन करताना सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे या शोमध्ये देखील तिला सूत्रसंचालन करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.
प्राजक्ता कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसली आहे. प्राजक्ताने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत आपली छाप उमटविली आहे. शेवटची ती पांडू या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. लवकरच ती लकडाउन या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे.