लोकप्रिय मालिका 'सीआयडी' आणि 'आहट' आता मराठीत, लवकरच येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:20 PM2024-11-07T18:20:04+5:302024-11-07T18:20:41+5:30

'CID' and 'Ahat' : 'सीआयडी' आणि 'आहट' या दोन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आजवर या मालिका हिंदी भाषेत आपण पहिल्या आहेत पण आता या मालिका मराठीत पाहता येणार आहेत.

Popular serials 'CID' and 'Ahat' now in Marathi, coming soon | लोकप्रिय मालिका 'सीआयडी' आणि 'आहट' आता मराठीत, लवकरच येणार भेटीला

लोकप्रिय मालिका 'सीआयडी' आणि 'आहट' आता मराठीत, लवकरच येणार भेटीला

छोट्या पडद्यावरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात आणि त्यांच्या आयुष्याचा भाग देखील होतात. तशाच आजवर टेलिव्हिजनवर गाजलेल्या मालिका सोनी मराठी वाहिनी आपल्या भेटीला घेऊन येत आहे. 'सीआयडी' (CID) आणि 'आहट' (Ahat) या दोन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आजवर या मालिका हिंदी भाषेत आपण पहिल्या आहेत पण आता या मालिका मराठीत पाहता येणार आहेत. ‘सीआयडी’ आणि 'आहट' या मालिकांचे विशेष असे काही भाग आपल्याला मराठीमध्ये पाहता येणार आहेत. हा थराराचा १ तास सोनी मराठीवाहिनीवर पाहता येईल. 

टेलिव्हिजनवरील सगळ्यात लोकप्रिय आणि आवडती क्राईम मालिका म्हणजेच सीआयडी (CID). आजवर टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त काळ असलेली मालिका म्हणजेच सीआयडी. या मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर दया आणि इन्स्पेक्टर अभिजीत अशी सगळीच पात्र सुपरहिट ठरली. संपूर्ण टीम मिळून घडलेल्या गुन्ह्या मागील सत्य शोधून काढायचे. या मालिकेने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता हाच कार्यक्रम आणि हीच सुपरहिट पात्र मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हो CID मालिका सोनी मराठी वाहिनीवर आता मराठीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या वेळेत होणार प्रसारीत

तसेच आहट ही एक थरार, हॉरर मालिका आहे. जवळ जवळ २० वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्या काळातील सगळ्यात थरारक मालिका ठरली होती. ही मालिका आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर हे विशेष असे भाग पाहायला मिळतील. सत्याचा शोध घेण्यासाठी येत आहे ए.सी.पी. प्रद्युम्न आणि टीम! ‘सीआयडी’ मालिका ९.३० वाजता आणि 'आहट' १०.३० वाजता भेटीला येणार आहे.

Web Title: Popular serials 'CID' and 'Ahat' now in Marathi, coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.