"एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर.."; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 10:57 AM2024-05-20T10:57:12+5:302024-05-20T10:57:45+5:30

मिलिंद गवळींनी आजच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाले मिलिंद बघा.. (milind gawali)

Post discussion about aai kuthe kay karte Milind Gawli final phase of loksabha voting 2024 | "एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर.."; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत

"एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर.."; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आजच्या मतदानाविषयी खास पोस्ट केली आहे. मिलिंद गवळी लिहितात, "लोकसभा निवडणूक २०२४. आज मी मतदानाला सकाळी जाणार आहे, मला माहिती आहे की तुम्ही पण सगळे सुजाण नागरिक आहात . जिथे जिथे निवडणुका झाल्या आहेत तिथे तुम्ही सगळ्यांनी तुमचं मतदान केलंच असणार . पण उद्या सकाळी महाराष्ट्रातल्या 13 सीट साठी निवडणुका होणार आहेत. त्याच बरोबर संपूर्ण भारतामध्ये उद्या अजून 36 ठिकाणी कॉन्स्टिट्यूअसीज मद्धे , उत्तर. प्रदेश जम्मू कश्मीर लडाख ओरिसा वेस्ट बंगाल बिहार आणि झारखंड."


मिलिंद गवळी पुढे लिहितात, "पाच वर्षातुन एकदा आपल्या भारतीय नागरिकांच्या हातात ताकत येते आपल्याला अधिकार मिळतो कोण आपला देश चांगल्या प्रकारे चालू शकतो हे निवडण्याचा, भारतीय नागरिक म्हणून तो आपला अधिकार आहे, कर्तव्य आहे . मला असं वाटतं हे सगळ्यांनाच माहित आहे, मी खरंतर हे सांगायची गरज नाहीये, पण एखादा नागरिक आळशी असेल कंटाळलेला असेल किंवा त्याची मतदान करण्याची इच्छा नसेल. तर त्या एखाद्या नागरिकांसाठी ही माझी पोस्ट आहे. मला त्या एका व्यक्तीला हे सांगावसं वाटतं की आळस करू नकोस तुझ्या एका मताने खूप काही घडू शकतं तुझ्या एका मताने पुढच्या पिढीचे भविष्य घडू शकतं"


मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "आपला देश सुरक्षित राहिला आपला देश समृद्ध झाला आपला देश जगामध्ये सगळ्यात पुढे गेला तर पुढच्या पिढीला आपण सुरक्षित करू,
आज जग अस्थिर झालेला आहे. रशिया आणि युक्रेन, ईजरायील आणि हामास यांच्यातलं युद्ध, चायना आणि पाकिस्तान यांच्या कू्रखोड्या . या सगळ्या अस्थीर परिस्थितीमध्ये भारत आपला देश हा भक्कम नेतृत्वानेच सुरक्षित राहील , त्यासाठी जाऊन तुला मतदान करणं आवश्यक आहे, तुला जो व्यक्ती योग्य वाटतो त्याला मत दे,
NOTA option पण आहे , एकही प्रतिनिधी तुला योग्यतेचा वाटला नाही तर सरळ नोटा च बटन दाब काही हरकत नाही, पण मतदान केंद्रावर जा आणि तुझं मत मांड, हक्क आहे तुझा संविधानाने तो हक्क तुला दिलेला आहे तो हक्क बजाव, मी वोट करणार आहे तुम्ही पण बोट करा."

Web Title: Post discussion about aai kuthe kay karte Milind Gawli final phase of loksabha voting 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.