'मरतो तो माणूस, पुरून उरतो तो देवमाणूस..!';'देवमाणूस २' मालिकेचं पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 05:10 PM2021-12-18T17:10:23+5:302021-12-18T17:10:53+5:30

'देवमाणूस' (Devmanus 2) मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Poster out of 'Devmanus 2' series, telecast on this day | 'मरतो तो माणूस, पुरून उरतो तो देवमाणूस..!';'देवमाणूस २' मालिकेचं पोस्टर आऊट

'मरतो तो माणूस, पुरून उरतो तो देवमाणूस..!';'देवमाणूस २' मालिकेचं पोस्टर आऊट

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस २' (Devmanus 2) मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सगळीकडे सुरु होती आणि प्रेक्षक उत्सुकतेने  दुसऱ्या भागाची वाट बघत होते. ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिकेने टीआरपीत अव्वल असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे आता तो क्षण लवकरच येणार आहे. 'देवमाणूस २' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच दुसऱ्या भागाचे पोस्टर समोर आले आहे. 

देवमाणूस मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि दुसऱ्या भागाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या दुसऱ्या भागाची नवीन टॅगलाइन  'मरतो तो माणूस, पुरून उरतो तो देवमाणूस..!' ही आहे. 


देवमाणूस मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हा अजितकुमार देव याचे नेमके काय होते याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आले नव्हते. मालिकेच्या अखेरच्या भागात अजितकुमार देव उर्फ देवी सिंग रुग्णालयात दाखल असल्याचे दाखवण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यातच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण अखेरच्या भागावरुनच प्रेक्षकांना या मालिकेचा दुसरा सीझन येणार असे वाटले होते.

'ती परत आलीये' मालिका घेणार निरोप
देवमाणूस मालिकेच्याच जागी 'ती परत आलीये' मालिका सुरु करण्यात आली होती. मात्र आता ही मालिका एका विलक्षण वळणावर संपणार आहे आणि त्याजागी 'देवमाणूस २' ही मालिका भेटीला येणार आहे. १९ डिसेंबरला रात्री ९ वाजता ही मालिका भेटीला येणार आहे आणि २० डिसेंबर पासून सोमवार ते शनिवारी रात्री १०.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Poster out of 'Devmanus 2' series, telecast on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.