प्राजक्ता माळीला हास्यजत्रेच्या कलाकारांनी दिलं वाढदिवसाचं खास गिफ्ट; खास फोटो शेअर करत म्हणाली…
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 19:08 IST2023-08-30T19:06:29+5:302023-08-30T19:08:02+5:30
हास्यजत्रेच्या कलाकारांनी मिळून प्राजक्ताला वाढदिवसानिमित्त खास भेटवस्तू दिली आहे.

Prajakta Mali
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Marathi Actress Prajakta Mali ) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकजण तिच्यावर अक्षरश: फिदा आहेत. नुकतेच प्राजक्ता माळीने ८ ऑगस्टला तिचा ३४ वा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. आता या सगळ्या हास्यजत्रेच्या कलाकारांनी मिळून प्राजक्ताला वाढदिवसानिमित्त खास भेटवस्तू दिली आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नृत्याचं चित्र रेखाटलेलं खास पेन्टिंग हास्यजत्रेच्या कलाकारांनी तिला भेट म्हणून दिलं आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटलं, “वाढदिवसाचं सुंदर गिफ्ट! तुमचे आभार मानेन तेवढे कमीच आहेत. खूप खूप धन्यवाद!”. शिवाय आपल्या हे पेन्टिंग कर्जत येथील फार्महाऊसवर लावणार असल्याचं तिने म्हटलं. हास्यजत्रेचे सगळ्या कलाकारांनी कर्जत येथील फार्महाऊसवर अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी समीर चौघुलेंनी तिचं औक्षण केलं होतं.
मराठी मालिकांपासून तिचा सुरु झालेला प्राजक्ताचा प्रवास चित्रपट, वेबसीरिजपर्यंत पोहोचला आहे. प्राजक्ता सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. अभिनयासह नृत्यातही ती पारंगत आहे. प्राजक्ताने ललित कला केंद्रातून भरतनाट्यमचे प्रशिक्षणही घेतले आहे. तसेच तिने स्वतःचा पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड ‘प्राजक्तराज’ ही सुरू केला आहे.