प्राजक्ताच्या 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेला १० वर्ष, अभिनेत्री म्हणाली, "महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना आयुष्यात आदित्य..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 02:26 PM2023-11-25T14:26:57+5:302023-11-25T14:27:32+5:30
"२ वर्षात माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं...", 'जुळून येती रेशीमगाठी'ला १० वर्ष पूर्ण, प्राजक्ताची खास पोस्ट
छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'जुळून येती रेशीमगाठी'. झी मराठीवरील या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेतील आदित्य-मेघनाची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली होती. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. त्यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना आवडली होती. या मालिकेला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता माळीची पोस्ट
आज “जुळून येती रेशीमगाठी” ला सुरू होऊन १० वर्ष झाली. #timeflies
त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं. आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार.#कृतज्ञता आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम.
आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या.)आदित्य-मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत. #आदित्य-मेघना ...महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयुष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. #बाबाजीलक्षअसूद्या
प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 'जुळून येती रेशीमगाठी'मधून प्राजक्ताने टीव्हीवर पदार्पण केलं होतं. पहिल्याच मालिकेने तिले लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं होतं. या मालिकेत प्राजक्ता आणि ललितबरोबर सुकन्या मोने, गिरीश ओक, उदय टिळेकर, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.