Prajakta Mali : प्राजक्ता माळीचे फोटोशूट सोशल मीडियावर ट्रोल, नेटकरी म्हणतात, 'असं वाटतंय...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 15:34 IST2023-04-19T15:30:42+5:302023-04-19T15:34:42+5:30
प्राजक्ताने जांभळ्या रंगाचा स्टायलिश ऑफ शोल्डर स्किन टाईट टॉप घातला आहे.

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचे फोटोशूट सोशल मीडियावर ट्रोल, नेटकरी म्हणतात, 'असं वाटतंय...'
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सतत सोशल मीडियावरील तिच्या पोस्टने लक्ष वेधून घेत असते. कधी नवनवे फोटोशूट तर कधी प्राजक्तराज चे दागिने मिरवताना दिसते. प्राजक्ताचे कितीही चाहते असले तरी अनेक जण तिला ट्रोल करण्याचीही संधी सोडत नाही. आता हेच बघा नव्या फोटोशूटमुळे सर्वांची लाडकी प्राजू प्रचंड ट्रोल झाली आहे.
प्राजक्ताने जांभळ्या रंगाचा स्टायलिश ऑफ शोल्डर स्किन टाईट टॉप घातला आहे. तर गडद निळ्या रंगाची पँट आणि हील्स घातली आहे. पण प्राजक्ताने कपड्यांवरुन नाही तर तिने यामध्ये दिलेल्या पोजवरुन ट्रोल झाली आहे. तिने पोस्ट केलेला पहिला फोटो खूपच कॉमेडी वाटतोय आणि म्हणूनच त्यावर तुफान कमेंट्स येत आहेत. दोन्ही पाय फाकवून ती उभी आहे असा फोटो तिने पोस्ट केलाय.
प्राजक्ताची अशी पोज बघून नेटकऱ्यांना सई ताम्हणकरचीच आठवण झाली आहे. 'सई सोबत राहून तू विचित्र फोटो काढत आहेस प्राजू' अशी कमेंट एकाने केली आहे. तर कोणी म्हणतंय,'खूप वेळ संडासात बसल्यावर पायाला मुंग्या येतात तेव्हा' अशी कमेंट दुसऱ्याने केली आहे. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शो मध्ये सूत्रसंचालन करते.