Prajakta Mali : "प्रेम आहे माझं माझ्या मराठीवर, राहील उद्या, परवा, मरणोत्तरही..."; प्राजक्ता माळीची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 03:39 PM2023-02-27T15:39:01+5:302023-02-27T15:46:55+5:30

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने खास पोस्ट केली आहे. यासोबतच तिचे मराठमोळ्या लुकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali special insta Post For marathi bhasha gaurav din | Prajakta Mali : "प्रेम आहे माझं माझ्या मराठीवर, राहील उद्या, परवा, मरणोत्तरही..."; प्राजक्ता माळीची खास पोस्ट

Prajakta Mali : "प्रेम आहे माझं माझ्या मराठीवर, राहील उद्या, परवा, मरणोत्तरही..."; प्राजक्ता माळीची खास पोस्ट

googlenewsNext

आज मराठी भाषा गौरव दिन आहे. राज्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जात आहे. याच दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) देखील खास पोस्ट केली आहे. यासोबतच तिचे मराठमोळ्या लुकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. तसेच "मराठी भाषा गौरव दिनाच्या महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा" असंही म्हटलं आहे. प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. 

"प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं.. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं… प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं... मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहिलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या “मराठीवर”…♥️♥️♥️जे आहे आज, राहील उद्या , परवा..मरणोत्तरही….. 🌟 “मराठी भाषा गौरव दिनाच्या”; महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा…♥️ "असं प्राजक्ता माळीने म्हटलं आहे.

प्राजक्ताने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नऊवारीतील पारंपारिक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने नाकात नथ आणि पारंपारिक दागिने घातले आहेत. फोटोंमधले अलंकार अर्थातच प्राजक्तराजचे असल्याचं देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे. मी मराठी, माझी मराठी, मातृभाषा, मराठी मुलगी, सह्याद्रीची लेक असे हॅशटॅग देखील प्राजक्ताने वापरले आहेत. 

आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. 'प्राजक्तप्रभा' या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता प्राजक्ताने नवीन पर्वाला सुरुवात केली असून 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. 

प्राजक्ता माळी म्हणते, दागिन्यांचा स्वतःचा ब्रॅण्ड काढेन, हा विचारही कधी मनात नव्हता. भावाच्या लग्नादरम्यान दागिन्यांबाबत काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक जाणवले ते म्हणजे आपले पारंपरिक दागिने लोप पावत आहेत. ध्यानीमनी नसतानाही हा नवीन प्रवास सुरू झाला आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अनेक तज्ज्ञांची, जाणकारांची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचा अस्सलपणा जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Prajakta Mali special insta Post For marathi bhasha gaurav din

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.