प्राजक्ता माळीने जिंकला होता हिंदी डान्स शो, डिनो मोरियाकडून मिळालेली ट्रॉफी; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 12:44 IST2024-03-13T12:43:30+5:302024-03-13T12:44:20+5:30
सोनाली बेंद्रे आणि डिनो मोरियासमोर छोट्या प्राजक्ताने ठुमके लावले

प्राजक्ता माळीने जिंकला होता हिंदी डान्स शो, डिनो मोरियाकडून मिळालेली ट्रॉफी; Video व्हायरल
'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali). मालिका संपल्यानंतरही तिची क्रेझ कमी झालेली नाही. सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करत ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. इथेही तिने आपल्या खास शैलीने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. पण तुम्हाला माहित असेलच अभिनयात येण्याआधी प्राजक्ता उत्तम नृत्यांगना होती. लहानपणी तिने एक हिंदी डान्स शोमध्ये भाग घेतला होता. इतकंच नाही तर तिने हा शो जिंकलाही होता.
प्राजक्ताला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे. भरतनाट्यम आणि इतरही डान्स प्रकारात ती पारंगत आहे. ती डान्स क्लासेसही घेते. सध्या सिनेमा, वेबसीरिज, हास्यजत्रा यामुळे प्राजक्ताचं नृत्य फारसं पाहता येत नाही. दरम्यान इन्स्टाग्रामवर तिच्या एका फॅन पेजवर तिचा जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'क्या मस्ती क्या धूम' या डान्स रिएलिटी शोचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये छोटी प्राजक्ता आहे जिला पहिल्या नजरेत ओळखणंही कठीण आहे. तिच्यासोबत आणखी दोन स्पर्धक आहेत. तर सोनाली बेंद्रे आणि डिनो मोरिया हे देखील स्टेजवर आहेत. यामध्ये अभिनेता डिनो मोरिया प्राजक्ताला विजेती घोषित करतो आणि ट्रॉफी देतो. त्याआधी तिला एक डान्स स्टेप करुन दाखवण्याचीही विनंती करतो. मग काय प्राजक्ता मस्त ठुमके लावते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
प्राजक्ताचं दिसणं, हसणं, अभिनय अशा सगळ्याच गोष्टींच्या चाहते प्रेमात आहेत. ती मराठीत सध्या भलतीच लोकप्रिय आहे. शिवाय सिनेमा, वेबसीरिजमध्येही ती झळकते. इतकंच नाही तर तिने स्वत:चा 'प्राजक्तराज' हा ज्वेलरी ब्रँडही सुरु केला आहे. प्राजक्ता माळी हे नाव आता दूरवर पोहोचलं आहे.