कुटुंबासह मुलगी बघायला आला पण अभिनेत्यालाच किचनमध्ये चहा बनवायला लागला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 01:41 PM2023-08-04T13:41:02+5:302023-08-04T13:42:24+5:30

मराठी अभिनेत्यावर ही काय वेळ आली? बघण्याच्या कार्यक्रमात स्वत:लाच बनवावा लागला चहा.

prasad jawade came with family at amruta deshmukh s place but end up in kitchen to make tea | कुटुंबासह मुलगी बघायला आला पण अभिनेत्यालाच किचनमध्ये चहा बनवायला लागला, कारण...

कुटुंबासह मुलगी बघायला आला पण अभिनेत्यालाच किचनमध्ये चहा बनवायला लागला, कारण...

googlenewsNext

मराठीतील सध्याचं लाडकं कपल म्हणजे प्रसाद जावडे (Prasad Jawade) आणि अमृता देशमुख (Amruta Deshmukh). बिग बॉसमध्ये या दोघांची जोडी जमली आणि ही जोडी थेट लग्नापर्यंत आली आहे.  काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले जे सगळ्यांच्याच पसंतीस पडले. तर प्रसाद आणि अमृताचा अगदी रितसर कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला. पण या कार्यक्रमात वेगळंच चित्र बघायला मिळालं. अमृताने या कार्यक्रमाचा मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ बघून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

प्रसाद जावडेचं कुटुंब अमृताच्या घरी तिला बघायला आले. या बघण्याच्या कार्यक्रमात खरंतर मुलीने चहा पोहे करायला पाहिजेत अशी पद्धत असते. मात्र इथे चित्र उलटंच दिसतंय. अमृताच्या घरी येऊन प्रसादलाच चहा बनवायला लागला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत अमृताने लिहिले, 'जेव्हा प्रसाद आणि फॅमिली मला "बघायला" आले..! नंतर मी माझ्या नाजूक हातांनी सगळ्यांना चहा serve केला..What happens in kitchen, stays in kitchen. Jokes apart…not just Prasad but his family also enjoyed our reversed चहा - पोहे कार्यक्रम ! Hopefully this “reversed” will be considered as “normal” soon..for every सून'

अमृताने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही खूप हसू आलं.'गोड कपल','किती क्युट व्हिडिओ आहे हा','लग्नानंतर तुला तिच्याच हातचा चहा प्यायचा आहे' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.तर मराठी सेलिब्रिटींनीही दोघांचं कौतुक केलंय.

Web Title: prasad jawade came with family at amruta deshmukh s place but end up in kitchen to make tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.