'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 09:10 AM2024-09-13T09:10:51+5:302024-09-13T09:12:20+5:30

'हास्यजत्रे' ला भेटली 'चला हवा येऊ द्या'ची टीम!

Prasad Khandekar shared photo with maharashyrachi hasyajatra team where they met chala hawa yeu dya team | 'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

महाराष्ट्राची हास्यजत्रा (MHJ) हा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम. हास्यजत्रेतील एकूण एक कलाकाराने सर्वांनाच खळखळून हसवलं आहे. प्रत्येक कलाकार आज स्टार झाल्यासारखाच आहे. हास्यजत्रेच्या आधी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमानेही सर्वांना वेड लावलं होतं. यातलेही सगळे कलाकार स्टार झाले होते. १० वर्ष पूर्ण करत या कार्यक्रमाने निरोप घेतला. आता या दोन्ही कॉमेडी युनिव्हर्स मधले कलाकार एकत्र आले तर काय धमाल येईल ना? प्रसाद खांडेकरने (Prasad Khandekar) शेअर केलेला फोटो त्याचीच झलक दाखवतोय.

मुंबई विमानतळावर एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला. महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम आज अमेरिका टूरसाठी रवाना झाली. प्रसाद खांडेकरने आज सकाळीच इन्स्टाग्रामवर एख फोटो शेअर केला. पण यामध्ये अर्धे हास्यजत्रा आणि अर्धी चला हवा येऊ द्या ची टीम दिसत आहे. दोन युनिव्हर्स एकत्र आल्यासारखं हे चित्र आहे. फोटोत प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, समीर चौघुले, चेतना भट, अरुण कदम,  गौरव मोरे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे हे मराठी कलाकार दिसत आहेत. शिवाय अभिनेत्री नेहा खानही आहे.


प्रसाद खांडेकरने गंमतीत 'लवकरच...... पुन्हा भेटू आणि खूप गप्पा मारु असं एकमेकांना प्रॉमिस करुन निघालो आम्ही. आज अचानक गाठ पडे...मित्रांसोबत एक प्रसन्न सकाळ' असं कॅप्शन दिलं आहे. खरं पाहता हे सर्वजण योगायोगाने विमानतळावर भेटले आहेत. हास्यजत्राची टीम अमेरिकेला जात आहे. तर इतर कलाकार वेगवेगळ्या कामासाठी रवाना झाले आहेत.

हा फोटो पाहून चाहतेही खूश झालेत. 'कॉमेडी सीरिज वाटतेय', 'मल्टीव्हर्स झालंय', 'हास्यजत्रा आणि हवा येऊ द्याचं कोलॅब' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

Web Title: Prasad Khandekar shared photo with maharashyrachi hasyajatra team where they met chala hawa yeu dya team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.