प्रेमाची कबुली दिल्यानंतर प्रथमेश-मुग्धाचा रोमॅण्टिक व्हिडीओ झाला व्हायरल; तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 18:28 IST2023-06-16T18:25:55+5:302023-06-16T18:28:31+5:30
Mugdha Vaishampayan: 'देखा हज़ारों दफ़ा आपको'; प्रथमेश-मुग्धाचा रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल

प्रेमाची कबुली दिल्यानंतर प्रथमेश-मुग्धाचा रोमॅण्टिक व्हिडीओ झाला व्हायरल; तुम्ही पाहिला का?
सध्या सोशल मीडियावर 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) यांची जोरदार चर्चा रंगली आहे. १५ जून रोजी या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली. त्यामुळे सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत त्यांची चर्चा रंगली आहे. यामध्येच सध्या चाहते या जोडीविषयी अनेक गोष्टी सर्च करायचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे यात या दोघांचा एक छानसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मुग्धाने काही दिवसांपूर्वी तिच्या युट्यूब चॅनेलवर आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती आणि प्रथमेश 'देखा हज़ारों दफ़ा आपको,फिर बेकरारी कैसी है, संभाले संभालता नहीं ये दिल, कुछ आप में बात ऐसी है!', हे गाणं गुणगुणताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
प्रथमेश-मुग्धाच्या नात्याची सुकन्या मोने यांना होती खबर; कमेंट करत म्हणाल्या...
दरम्यान, मुग्धाचं युट्यूबवर मुग्धा वैशंपायन या नावाने पेज आहे. सध्याच्या घडीला तिचे युट्यूबवर 59 k फॉलोअर्स आहेत. एकमेकांच्या प्रेमात असलेली ही जोडी बऱ्याचदा एकत्र गाण्याचेही कार्यक्रम करत असतात. त्यामुळे या कार्यक्रमाचे वा अन्य गाण्याचे व्हिडीओ ते या युट्यूब चॅनेलवर पोस्ट करतात.