मुग्धाच्या उत्तरासाठी प्रथमेशला पाहावी लागली वाट; 'या' कारणामुळे मुग्धाने दिला उशीरा होकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:01 PM2023-07-05T12:01:05+5:302023-07-05T12:02:46+5:30

Mugdha vaishampayan: प्रथमेशने प्रपोज केल्यानंतर मुग्धाने त्याला लगेच होकार दिला नाही. विशेष म्हणजे त्यामागेदेखील खास कारण आहे.

prathamesh laghate mugdha vaishampayan lovestory took three days to answer | मुग्धाच्या उत्तरासाठी प्रथमेशला पाहावी लागली वाट; 'या' कारणामुळे मुग्धाने दिला उशीरा होकार

मुग्धाच्या उत्तरासाठी प्रथमेशला पाहावी लागली वाट; 'या' कारणामुळे मुग्धाने दिला उशीरा होकार

googlenewsNext

सध्या मराठी कलाविश्वामध्ये मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (prathamesh laghate) या जोडीची चर्चा आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सगळ्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला. आमचं ठकलंय असं म्हणून त्यांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली. सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. यामध्येच पहिले कोणी कोणाला प्रपोज केलं, त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली, घरातल्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. यामध्येच आता प्रथमेशने प्रपोज केल्यानंतर मुग्धाने त्याला होकार द्यायला तीन दिवस का लावले या मागचं कारण समोर आलं आहे.

अलिकडेच प्रथमेश आणि मुग्धाने राजश्री मराठीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मुग्धाने तिला प्रपोज करण्याचा किस्सा सांगितला. तसंच मुग्धाने होकार द्यायला तीन दिवस का लावले या मागचं कारणही सांगितलं.

"आमच्या मनात काय आहे हे आम्हा दोघांनाही माहित होतं. त्यामुळे तिचं उत्तर काय असेल याची मला कल्पना होती. पण शेवटी डोक्यावर थोडी टांगती तलवार असतेच ना, तशी माझ्याही होती. तीन दिवस ही टांगती तलवार माझ्या डोक्यावर होती", असं प्रथमेश म्हणाला. यावर मुग्धानेही उत्तर द्यायला वेळ का लावला हे सांगितलं.

"मी उत्तर द्यायला तीन दिवस लावले यामागे खरं तर खूप छान कारण आहे. त्याने एका कार्यक्रमाच्या रिहर्सलदरम्यान मला विचारलं होतं. रिहर्सल झाल्यावर त्याने मला प्रपोज केलं. माझ्या चेहऱ्यावरुन त्याला माझं उत्तर माहित झालं असेल याची मला खात्री होती. पण तरी, मी मुद्दाम त्याला तेव्हा उत्तर दिलं नाही. कारण, तीन दिवसांनी माझा वाढदिवस होता. त्यामुळे जर प्रपोज केलंच आहे तर चांगल्या दिवशी आपण होकार कळवुयात. कारण, मग तो दिवस कायम लक्षात राहिल. त्यामुळेच मी प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन दिवस लावले", असं मुग्धा म्हणाली.

दरम्यान, प्रथमेश आणि मुग्धा या दोघांनी संगीत क्षेत्रात दोघांचीही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जवळपास १५ वर्षांपूर्वी या दोघांची मैत्री झाली आणि त्याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. या जोडीच्या अफेअरविषयी कळल्यानंतर आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: prathamesh laghate mugdha vaishampayan lovestory took three days to answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.