'लघाटे आंबेवाले...', गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रथमेश लघाटे सुरू करतोय आंब्याचा व्यवसाय, शेअर केली पोस्ट
By कोमल खांबे | Updated: March 22, 2025 15:44 IST2025-03-22T15:43:30+5:302025-03-22T15:44:07+5:30
मुळचा रत्नागिरीचा असलेला प्रथमेश दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा व्यवसायाला सुरुवात करतो. यावर्षीही गुढीपाडव्यापासूनच तो याची सुरुवात करणार आहे.

'लघाटे आंबेवाले...', गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रथमेश लघाटे सुरू करतोय आंब्याचा व्यवसाय, शेअर केली पोस्ट
'सारेगमप लिटिल चॅम्प'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक म्हणजे प्रथमेश लघाटे. उत्तम आवाजामुळे चर्चेत येणारा प्रथमेश एक उद्योजकदेखील आहे. प्रथमेशच्या घरी वर्षानुवर्ष आंब्यांच्या विक्रीचा व्यवसाय केला जातो. गायकही दरवर्षी त्याच्या या पारंपरिक व्यवसायात मदत करताना दिसतो. यावर्षीही उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा विक्रीच्या व्यवसायाला तो सुरुवात करणाप आहे.
मुळचा रत्नागिरीचा असलेला प्रथमेश दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आंबा व्यवसायाला सुरुवात करतो. यावर्षीही गुढीपाडव्यापासूनच तो याची सुरुवात करणार आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. "नमस्कार! Welcome to Mango season 2025!🤩🥭 आंबाप्रेमींच्या सेवेत यावर्षी सुद्धा रुजू होत आहोत! तीच चव, अव्वल दर्जा, तसाच गोडवा! गुढीपाडव्यासाठी “लघाटे आंबेवाले”यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमाखदार परंपरा अबाधित ठेवा!", असं प्रथमेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रथमेशच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे. तसेच त्याच्या या व्यवसायासाठी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. लग्नानंतर मुग्धादेखील प्रथमेशला या व्यवसायात साथ देताना दिसते.