प्रथमेश परब आणि कृतिका देव झळकणार प्रेम हे मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2017 06:45 AM2017-03-11T06:45:54+5:302017-03-11T12:15:54+5:30
प्रेम हे रूप, रंग, समाज यांचा विचार करत नाही असे म्हटले जाते. अशाच प्रेमाची गोष्ट प्रेम हे या मालिकेत ...
प रेम हे रूप, रंग, समाज यांचा विचार करत नाही असे म्हटले जाते. अशाच प्रेमाची गोष्ट प्रेम हे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रंगाने काळा असलेला मुलगा अतिशय सुंदर मुलीच्या प्रेमात पडतो आणि तीही त्याच्या प्रेमात पडते. कोणाची कसलीही तमा न बाळगता ते दोघे एकमेकांचे होतात. पण ज्यावेळेस निर्णायक क्षण येतो, तेव्हा काही अनपेक्षित गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात. याची कल्पनादेखील त्या दोघांनी केलेली नसते अशी डाबंऱ्याची कथा प्रेम हे या मालिकेत दाखवली जाणार आहे. यात प्रथमेश परब आणि कृतिका देव यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
या कथेतील नायक रंगाने काळा, अतिशय गरीब असून झोपड्पट्टीत राहणारा आहे. पण त्याचा स्वतःच्या बोलबच्चनवर पूर्णपणे विश्वास आहे तर नायिका ही श्रीमंत घराण्यातील अतिशय देखणी मुलगी आहे. खरे तर आजच्या जनरेशनला प्रेमात पडणे आणि वाहत जाणे वगैरे पटतच नाही. सगळेच सध्या करियरच्या मागे धावत आहेत आणि त्यामुळे प्रेमापासून दूर पळत आहेत असे म्हटले जाते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रेमाला भाषा नसते, असते ती केवळ भावना. जी कधी, कशी आणि कोणाला समजेल उमगेल याची शास्वती कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे आजही प्रेमात वाहून जाणारे अनेकजण आपल्याला पाहायला मिळतात.
डांबऱ्या या कथेत अगदी दोन वेगळ्या मतांची, भिन्न सामाजिक स्तरातील तरुण-तरुणी कशाप्रकारे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुढे या प्रेमाचे नक्की काय होते हे पाहायला मिळणार आहे. ही कथा गणेश पंडित यांनी लिहिली असून याचे दिग्दर्शन प्रवीण परब यांनी केले आहे.