मूल होत नव्हतं म्हणून बालिका वधू फेम Neha Marda लोक मरायचे टोमणे, म्हणाली- 'मी खूप...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 01:49 PM2023-01-30T13:49:25+5:302023-01-30T13:53:44+5:30

अभिनेत्रीने आता एका लेटेस्ट मुलाखतीत खुलासा आहे. म्हणाली, मूल होत नाही म्हणून लोक टोमणे मारायचे.

Pregnant Neha Marda said people taunting her that she does not want a child because of ambition | मूल होत नव्हतं म्हणून बालिका वधू फेम Neha Marda लोक मरायचे टोमणे, म्हणाली- 'मी खूप...'

मूल होत नव्हतं म्हणून बालिका वधू फेम Neha Marda लोक मरायचे टोमणे, म्हणाली- 'मी खूप...'

googlenewsNext

Neha Marda On Pregnancy: बालिका वधू फेम अभिनेत्री नेहा मर्दा लग्नाच्या 10 वर्षांनंतर आई होणार आहे. लग्नाच्या एवढ्या मोठ्या कालावधीनंतर ती आई होणार असल्याच्या बातमीने ती आणि तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. लग्न आणि प्रेग्नेंन्सीमध्ये 10 वर्षांच्या अंतरात नेहा मर्दाला अनेक टोमणे ऐकावे लागले. अभिनेत्रीने सांगितले की, आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक तिला महत्त्वाकांक्षी म्हणायचे आणि मूल होत नाही म्हणून टोमणे मारायचे.

लोकांनी मारले टोमणे
नेहा मर्दाने 2012 मध्ये पाटण्यात राहणारा बिझनेसमन आयुष्मान अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर तिला मूल न झाल्याबद्दल खूप टोमणे मारले गेले, ज्याबद्दल अभिनेत्रीने आता एका लेटेस्ट मुलाखतीत खुलासा आहे. नेहा म्हणाली, “जेव्हा मला माझ्या प्रेग्नेंसीबद्दल कळले तेव्हा मी खूप उत्साहित होते. मला जसं लग्न करायचं होतं तसंच मला आई व्हायचं होतं. लग्नाच्या 10 वर्षांनंतर माझ्या पहिल्या मुलाची आई होताना मला खूप आनंद होत आहे. असे नाही की आम्ही 10 वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करत नव्हतो, पण लग्नानंतर मला मुलं नको, मी खूप महत्त्वाकांक्षी आहे', असे लोकांकडून टोमणे मारले गेले.

नेहा मर्दाने सांगितले की कसे नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक ति प्रेग्नेंट होत नसल्यान जज करायचे. नेहा म्हणाली, “तुला माहित आहे की नातेवाईक आणि दूरचे लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात. तुमचे कुटुंब नाही, कारण ते तुम्हाला ओळखतात. आजूबाजूचे लोक ज्यांना आपण आवश्यकही मानत नाही, ते हस्तक्षेप करतात. मी त्यांची कधीच पर्वा केली नाही.''


 

Web Title: Pregnant Neha Marda said people taunting her that she does not want a child because of ambition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.