रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर अपूर्वा नेमळेकरने खरेदी केली नवी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:16 PM2024-08-20T12:16:56+5:302024-08-20T12:19:32+5:30

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची स्वप्नपूर्ती झाली आहे.

premachi gosht fame actress apurva nemlekar bought new car on the occasion of raksha bandhan video viral  | रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर अपूर्वा नेमळेकरने खरेदी केली नवी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर अपूर्वा नेमळेकरने खरेदी केली नवी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

Apurva Nemlekar Dream Car Video : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची स्वप्नपूर्ती झाली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. नुकतीच अपूर्वाने नवी कार खरेदी केली आहे. 


'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहचली. या मालिकेत तिने साकारलेल्या शेवंताच्या भूमिकेने प्रेक्षकांवर जणू जादूच केली. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारत आहे. अपूर्वा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. यामाध्यमातून ती तिचे प्रोजेक्ट्स तसेच वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांना अपडेट्स देत असते. नुकताच तिने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

या व्हिडीओच्या माध्यमातून अपूर्वाने महागडी कार खरेदी केल्याची माहिती दिली आहे. रक्षाबंधानाच्या दिवशी अपूर्वाने मारुती सुझुकीची ग्रॅड विटारा ही हायब्रीड कार खरेदी केली आहे.  सध्या मार्केटमध्ये या गाडीची किंमत १० लाख इतकी आहे. दरम्यान,व्हिडीओमध्ये नवी गाडी खरेदी केल्याचा आनंद अपूर्वाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहलंय, "रक्षाबंधन आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या शुभदिनी ही नवीन गाडी खरेदी केली आहे". असं म्हणत अभिनेत्रीच्या तिच्या वडील आणि भावाच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय.

सोशल मीडियावर अपूर्वा नेमळेकरच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 'आभास हा', 'तू माझा सांगती' तसेच 'प्रेम हे' यांसारख्या मालिकांमध्येही ती झळकली आहे.

Web Title: premachi gosht fame actress apurva nemlekar bought new car on the occasion of raksha bandhan video viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.