'प्रेमाची गोष्ट' मधील 'ही' लोकप्रिय अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत; पोस्टद्वारे दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:03 IST2025-02-05T11:01:25+5:302025-02-05T11:03:39+5:30
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.

'प्रेमाची गोष्ट' मधील 'ही' लोकप्रिय अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत; पोस्टद्वारे दिली माहिती
Mrunali Shirke : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिकेतून एक्झिट घेतल्याने सर्वत्र प्रेमाची गोष्टबद्दल अधिक चर्चा होऊ लागली. अगदी काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मुक्ता, सागर, सई, माधवी, पुरू, इंद्रा, जयंत कोळी या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. दरम्यान, 'प्रेमाची गोष्ट' मध्ये मिहिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री मृणाली शिर्केने अचानक मालिकेतून एक्झिट घेतली. या मालिकेत अभिनेत्री मृणाली शिर्केने मुक्ताच्या मावस बहिणीची भूमिका साकारली होती. तिने मालिका सोडण्यामागचं कारण अद्याप अनुत्तरितच आहे.
अशातच, 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर मृणाली शिर्के आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या येणार आहे. अभिनेत्री लवकरच एका हिंदी मालिकेत दिसणार आहे. स्टार प्लसवरील लोकप्रिय 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत तिची वर्णी लागली आहे. मृणाली या मालिकेमध्ये जुही नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्री याबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. तिला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत.
'गुम है किसी के प्यार में' मध्ये नवा अध्याय सुरु झाला आहे. त्यामध्ये मालिकेत आता नवीन चेहरे दिसणार आहेत. मृणालीसोबत अभिनेत्री मीरा सारंग आणि विनायक भावे हे मराठी कलाकार सुद्धा मालिकेत पाहायला मिळणार आहेत.