चालू सीनमध्ये डायलॉग विसरली अभिनेत्री तेजश्री प्रधान; पुढे काय झालं? पाहा व्हायरल VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 15:30 IST2024-02-19T15:29:18+5:302024-02-19T15:30:52+5:30
सध्या तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

चालू सीनमध्ये डायलॉग विसरली अभिनेत्री तेजश्री प्रधान; पुढे काय झालं? पाहा व्हायरल VIDEO
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तिच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. मालिकांनी तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. तिला खरी ओळख मिळाली ती होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता ही भूमिका प्रेक्षकांना पसंत पडली आहे. नुकतेच तेजश्रीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सेटवरील तेजश्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आता होऊ दे धिंगाणामध्ये तेजश्रीने अपूर्वाची भूमिका सावनी साकारली तर अपूर्वाने तेजश्रीची मुक्ता भूमिका साकारली. हे नाट्य सुरू झालं आणि नेमकं तेजश्री पुढचे डायलॉगचं विसरली. डायलॉग विसरल्यावर तिनं सर्वांची माफी मागितली आणि पुन्हा एन्ट्री घेत सावनी ही भुमिका साकारली. या व्हिडीओवर चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.
तेजश्री मालिकांशिवाय 'ती सध्या काय करते', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'झेंडा', 'लग्न पहावे करुन' यांसारख्या सिनेमातही झळकली आहे. तर नुकतेच ती मराठी चित्रपट लोकशाही (Lokshahi Movie) च्या मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ९ फ्रेबुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मनाला प्रश्नांच्या घेऱ्यात अडकवणारं कथानक, गंभीर आणि खोल संवाद, दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी, मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि अंगावर शहारे आणणारं पार्श्वसंगीत या समीकरणामुळे लोकशाही चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र दिसली. लोकशाही हा राजकारणातील अराजकता टिपणारा आणि घराणेशाही व्यवस्थेवर बोट ठेवणारा प्रभावी चित्रपट आहे.