'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये पाहायला मिळणार सुखद क्षण, गुरुनाथ नाही तर राधिका अडकणार विवाह बंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 12:18 PM2019-10-15T12:18:48+5:302019-10-15T12:19:01+5:30

आता हि मालिका अतिशय महत्वाच्या वळणावर आली आहे. राधिकाने गुरुनाथला डिव्होर्स देऊन त्याच्यासोबत असलेलं नातं तोडून टाकलं आहे

Preparation of saumitra and radhika engagement in Mazya Navryachi Bayko | 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये पाहायला मिळणार सुखद क्षण, गुरुनाथ नाही तर राधिका अडकणार विवाह बंधनात

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये पाहायला मिळणार सुखद क्षण, गुरुनाथ नाही तर राधिका अडकणार विवाह बंधनात

googlenewsNext

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे.

आता हि मालिका अतिशय महत्वाच्या वळणावर आली आहे. राधिकाने गुरुनाथला डिव्होर्स देऊन त्याच्यासोबत असलेलं नातं तोडून टाकलं आहे. तिचं आणि सौमित्रचं नवं नातं सुरु करायच्या आधी राधिका जुने पाश तोडून टाकते. एकीकडे राधिका आणि सौमित्रच्या साखरपुड्याची जोरात तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे पच्छाताप झालेला गुरु राधिकाजवळ येऊन तिला सगळ्या गोष्टींवर फेर विचार करायला सांगतो, पण ती नकार देते. साखरपुड्यासाठी नागपूरवरून आलेले ३-४ पाहुणे सूनेचं लग्न लावून देताय म्हणजे तुम्ही  घराण्याचं नाक कापताय असं राधिकाच्या सासऱ्यांना ऐकवतात. राधिका सौमित्रच्या साखरपुड्याच्या दिवशी देखील गुरुनाथ तिकडे विघ्न निर्माण करण्यासाठी सज्ज होणार आहे. राधिका आणि सौमित्रचा साखरपुडा निर्वीघ्नपणे पार पडेल का? गुरु तिकडे जाऊन काय तमाशा करेल? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
 

Web Title: Preparation of saumitra and radhika engagement in Mazya Navryachi Bayko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.