स्टार प्रवाहवरील 'नकळत सारे घडले'च्या प्रिन्स दादाचं युट्यूब चॅनेल हिट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 08:26 AM2018-05-31T08:26:50+5:302018-05-31T13:56:50+5:30
मालिकेच्या सेटवर धावपळ, शूटिंग सुरू असलं, तरी काही कलाकार आपल्या छंदांना, आवडींनाही प्राधान्य देतात. स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' ...
म लिकेच्या सेटवर धावपळ, शूटिंग सुरू असलं, तरी काही कलाकार आपल्या छंदांना, आवडींनाही प्राधान्य देतात. स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेतील प्रिन्स दादाने आपली गाण्याची आवड जपण्यासाठी युट्यूबवर चॅनेल सुरू केलं असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
'नकळत सारे घडले'मध्ये प्रिन्सची भूमिका करणारा आशिष गाडे स्वतः उत्तम वादक आणि गायक आहे. तो गिटार, सिंथेसायजर अशी वाद्य वाजवतो. प्रतापची भूमिका साकारणारा हरीश दुधाडेही उत्तम गायक आहे. या दोघांची मालिकेच्या ऑडिशनवेळी भेट झाली. गप्पांमध्ये दोघांना एकमेकांच्या संगीताच्या आवडीविषयी कळलं. मालिकेचे शूटिंग सुरू झाल्यावर काही दिवसांनी हरीश आशिषकडून गिटार वाजवायलाही शिकला. त्यानंतर एकदा गंमत म्हणून मेकअप रूममध्ये दोघांनी गिटार वाजवत गाणं गायलं आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिथे त्यांचे खूप कौतुक झाले. त्यामुळे आशिषने ashish gade entertainment युट्यूब चॅनेल सुरू करून नियमितपणे व्हिडिओ शेअर करायचे ठरवले. मालिकेत संजयची भूमिका साकारणारा सुप्रीत कदमही त्यांच्यात सामील झाला. त्या तिघांनी अनेक सुपरहिट गाण्यांचे एक फ्युजन केले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता तर ते चित्रीकरणाच्या फावल्या वेळात त्यांची संगीताची ही आवड जपत असतात. आशिष आणि हरीशच्या गाण्यांमुळे सेटवरचे वातावरणही संगीतमय होऊन जातं. या युट्यूब चॅनेललला दोन हजार सबस्क्रायबर्सही मिळाले आहेत.
'मालिकेच्या सेटवर फावल्या वेळात बाकी काही करण्यापेक्षा आम्ही गाणी गाऊन छान एन्जॉय करतो. सेटवरची बाकीची मंडळी आणि कलाकारही सहभागी होतात. जिथे संगीत असतं, तिथं खूप सकारात्मक उर्जा असते असं मला वाटतं. त्यामुळे एक गंमत म्हणून आम्ही गाणं सुरू केलं होतं. आता त्याला अधिक चांगल्या पद्धतीनं सादर करणार आहोत,' असे हरीशने सांगितले.
सेटवर गमतीजमतीचे वातावरण असलं, तरी नकळत सारे घडले आता रंजक वळणावर आहे. त्यासाठी या मालिकेत पुढे काय काय होणार हे पाहाण्यासाठी ही मालिका आवर्जून पाहा.
Also Read : ‘नकळत सारे घडले’च्या सेटवर या कारणामुळे झाले जंगी सेलिब्रेशन