'लेडी लव्ह' युविकासाठी प्रिंसने केला नावात बदल, आता 'या' नावाने ओळखला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 07:00 IST2018-07-31T14:25:01+5:302018-08-01T07:00:00+5:30

प्रिंसने तर युविकाच्या नावाचा टॅटूही काढला आहे.लग्नासाठी आम्ही दोघंही एक्सायटेड आहोत.

Prince Narula adds fiancee Yuvika's name to his own; here's all the romantic things he has done | 'लेडी लव्ह' युविकासाठी प्रिंसने केला नावात बदल, आता 'या' नावाने ओळखला जाणार

'लेडी लव्ह' युविकासाठी प्रिंसने केला नावात बदल, आता 'या' नावाने ओळखला जाणार

आली लग्न घटिका समीप, करा हो लगीनघाई म्हणत अभिनेत्री युविका चौधरीसह प्रिंस नरुला लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी युविका सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांची होणा-या नवरीच्या मनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था आता युविकाची झाली आहे.तर दुसरीकडे प्रिंसची काही वेगळी अवस्था नाही. प्रिंसने तर युविकाच्या नावाचा टॅटूही काढला आहे.लग्नासाठी आम्ही दोघंही एक्सायटेड आहोत. दोघांनी याच वर्षी जानेवारीमध्ये साखरपूडा केला होता. खुद्द प्रिंसनेही सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना ही गुड न्युज दिली होती.

विशेष म्हणजे आजही लग्नानंतर मुलीचे नावात बदल करण्यात येतो. मात्र या कपलच्या बाबतीत जरा हटके गोष्ट समोर आली आहे. ते म्हणजे काही दिवसांपुर्वी प्रिन्स नरुलाने आपले नाव बदलून प्रिंस युविका नरुला असे ठेवले आहे. त्याला याविषयी विचारण्यात आले तर तो म्हणाला की, 'एकदा विचार केला की, युविकासाठी काही तरी स्पेशल करावे, तर मी तिचे नाव माझ्या नावासोबत जोडले. मला नव्हते माहित की, लोक याला एवढे नोटिस करतील. असे करुन मी खुप आनंदी आहे.'

एकत्र काम करत असताना कलाकारांमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात हे तर जगजाहीर आहे. असंच काहीसं या दोघांच्या बाबतीत घडलं. 
दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. विशेषतः प्रिंस आपल्या लेडी लव्ह युविकाला खुश ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो. सकाळ संध्याकाळ प्रिंस युविकासाठी विविध गिफ्ट घेऊन येत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: Prince Narula adds fiancee Yuvika's name to his own; here's all the romantic things he has done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.