प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 15:40 IST2024-07-19T15:39:32+5:302024-07-19T15:40:16+5:30
प्रिन्स आणि युविका बाळाच्या आगमनासाठी खूप आतुर आहेत. नुकतंच त्यांनी मुंबईत नवीन घरही घेतलं

प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर
टीव्हीवरील मोस्ट रोमँटिक कपल प्रिन्स नरुला (Prince Narula) युविका चौधरी (Yuvika Chaudhary) आईबाबा होणार आहेत. लग्नानंतर ६ वर्षांनंतर या जोडीने गुडन्यूज दिली आहे. बिग बॉस सिझन 9 मध्ये दोघं प्रेमात पडले. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर ते लग्नबंधनात अडकले. आता पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी दोघंही तयार आहेत. बाळाच्या जन्माआधी प्रिन्स आणि युविकाने नुकतंच नवीन घर घेतलं. याची झलक त्यांनी व्हिडिओ शेअर करत दाखवली.
प्रिन्स आणि युविका बाळाच्या आगमनासाठी खूप आतुर आहेत. नुकतंच त्यांनी मुंबईत नवीन घरही घेतलं. याआधीही दोघं लक्झरी घरात राहत होते. मात्र आता बाळासाठी त्यांनी आणखी एक आलिशान घर घेतलं. युविकाने आपल्या व्लॉगमधून नवीन घराची झलक दाखवली. यावेळी प्रिन्स ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. तर युविका रेड अँड व्हाईट आयऊटफिटमध्ये सुंदर दिसत आहे. दोघंही घराबाहेर पोज देताना दिसत आहेत. कपल आपल्या 3 बीएचके लॅव्हिश अपार्टमेंटची झलक दाखवत आहेत.
प्रिन्स आणि युविकाने मुंबईतील लोखंडवाला येथे अपार्टमेंट खरेदी केलं. घराबाहेर प्रिन्सचे वडील अभिनेचे जोगिंदर नरुलाची नेमप्लेट लावली आहे. दोघांनी रिबिन कट करत अपार्टमेंटमध्ये एन्ट्री केली. गार्डनर एरियापासून बेडरुमपर्यंतची झलक त्यांनी दाखवली. दोघांना नेहमीच घरात एक पर्सनल स्पेस हवी होती जी मुंबईतल्या घरी मिळणं कठीण असतं असंही ते म्हणत आहेत.