'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक आणि प्रियदर्शनीचा ‘चलेया’ गाण्यावर भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 18:56 IST2023-09-21T18:54:38+5:302023-09-21T18:56:07+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधील प्रियदर्शनी इंदलकर आणि पृथ्वीक प्रताप या दोघांनी ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

Prithvik Pratap,Priyadarshini Indalkar
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात शाहरुखचा हटके अंदाज आणि सिनेमातील लूक पाहून चाहते भारावून गेले आहेत. चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. जवान चित्रपटातील 'चलेया' हे गाणं फार चर्चेत आहे. अनेकांनी या गाण्यावर रील व्हिडीओ देखील बनवले आहेत.
सध्या हे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतायत. अशात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधील प्रियदर्शनी इंदलकर आणि पृथ्वीक प्रताप या दोघांनी या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या भन्नाट डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फार खूश झालेत. या व्हिडीओला पृथ्वीकनं कॅप्शन दिलं की, 'कात्रजच्या नयनतारासह "चलेया". तर प्रियदर्शनीनं कमेंटमध्ये म्हटलं, 'हाये मेरा विक्रोळी का शाहरुख!'. अनेकांनी हार्ट आणि हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे.
पृथ्वीक प्रतापनं काही दिवसांपूर्वी जवान सिनेमातील शाहरुखचा टक्कल पडलेला लूक रीक्रिएट केला होता. त्याने शाहरुखप्रमाणे डान्सही केला. या लूकमधील व्हिडिओ पृथ्विकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता.
कॅप्शनही हटके दिलं होतं. त्यानं म्हटलं होतं की, 'जवानच्या पार्श्वभूमीवर हे रील आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर माझी हंडी म्हणजे माझं टक्कल सादर करतोय. दरम्यान पृथ्वीक शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे हे त्याने वेळोवेळी सांगितलं आहे.