Video: लग्नानंतरचा पहिलाच मकरसंक्रांतीचा सण अन् अभिनेत्याला पत्नीने काढलं घराबाहेर, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:08 IST2025-01-15T13:07:57+5:302025-01-15T13:08:54+5:30

पृथ्वीक प्रताप आणि त्याच्या पत्नीचं कॉमेडी रील सोशल मीडियावर व्हायरल झालंय. पृथ्वीक बायकोला काय म्हणाला बघा (prithvik pratap)

prithvik pratap reel video viral with wife from maharashtrachi hasyajatra | Video: लग्नानंतरचा पहिलाच मकरसंक्रांतीचा सण अन् अभिनेत्याला पत्नीने काढलं घराबाहेर, काय घडलं?

Video: लग्नानंतरचा पहिलाच मकरसंक्रांतीचा सण अन् अभिनेत्याला पत्नीने काढलं घराबाहेर, काय घडलं?

काल (१४ जानेवारीला) सगळीकडे मकरसंक्रांत उत्साहात साजरी झाली. मराठी सेलिब्रिटींनीही मकरसंक्रांतीचा खास सण साजरा केला. अनेक मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींचं नुकतंच लग्न झाल्याने त्यांनी लग्नानंतरचा पहिला मकरसंक्रांत सण साजरा केला. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने मकरसंक्रांतीनिमित्त बायकोसोबत केलेलं रील सोशल मीडियावर व्हायरल झालंय. काय आहे या रीलमध्ये?

पृथ्वीकचं बायकोसोबत खास रील

अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याची बायको प्राजक्ता वायकुळसोबत खास रील केलं. यावेळी मकरसंक्रांतीच्या एकमेकांना शुभेच्छा देताना पृथ्वीकने बायकोला वेगळ्याच शुभेच्छा दिल्याने त्याला थेट घराबाहेर जावं लागलं. आधी पृथ्वीकची बायको त्याला तिळगूळ देताना म्हणते की, "पृथ्वीक तिळगूळ घे आणि गोड गोडच बोल!" त्यावर बायकोला शुभेच्छा देताना पृथ्वीक म्हणतो की, "प्राजक्ता तू सुद्धा, तिळगूळ घे आणि थोडं थोडंच बोल". 


शेवटी पृथ्वीक घराबाहेर उभा असलेला दिसतो. तो प्राजक्ताला मनवताना दिसून तिची माफी मागतो. शेवटी हॅपी मकरसंक्रांती म्हणत पृथ्वीकचं हे रील संपतं. पृथ्वीकच्या या रीलला त्याच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिलीय. पृथ्वीक प्रताप हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेता. पृथ्वीकने काहीच महिन्यांपूर्वी त्याची मैत्रीण प्राजक्ता वायकुळसोबत लग्नगाठ बांधली. कोणताही दिखावा न करता साध्या पद्धतीने पृथ्वीकने लग्न केलं.

Web Title: prithvik pratap reel video viral with wife from maharashtrachi hasyajatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.