Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 11:48 AM2024-09-27T11:48:20+5:302024-09-27T11:56:00+5:30

निक्की तांबोळीविषयी काय म्हणाली प्रिया?

Priya Bapat reaction on Bigg Boss marathi season 5 reveals who is her favourite contestant | Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."

Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या मराठी नाटक, हिंदी सिनेमा, हिंदी सीरिज अशा बऱ्याच प्लॅटफॉर्मवर दिसत आहे. तिचं 'जर तरची गोष्ट' नाटक गाजतंय. शिवाय नुकताच तिचा 'विस्फोट' हा हिंदी सिनेमा रिलीज झाला. तर आता ती आगामी 'रात जवाँ है' या हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यानिमित्त प्रियाने लोकमत फिल्मीशी संवाद साधला. यावेळी तिने सध्या चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठीवरही (Bigg Boss Marathi Season 5) प्रतिक्रिया दिली. 

नेहमी सरळ बोलणारी, हसतमुख असणारी प्रिया बापट बिग बॉस बघते का? तिचे आवडते स्पर्धक कोण? यावर प्रियाने उत्तर दिलं आहे. 'लोकमत फिल्मी'शी बोलताना प्रिया म्हणाली, "आमच्या घरी कधीकधी बिग बॉस बघितलं जातं. मी अगदी नियमित फॉलो करत नाही. सुरुवातीला मी एपिसोड्स बघितले तेव्हा मला खूप त्रास झाला. सारखी कचकच भांडणं मला आवडत नाही. कधीतरी बघते."


"जितकं मी पाहिलंय त्यात मला पॅडी दादा आवडतो. तसंच मला वाटतं अभिजीत, पॅडी दादा आणि अंकिता हे तिघंही आपल्या खऱ्या स्वभावाला आणि मराठी संस्कृतीला जपून खेळतात. ते धज्जियाँ उडवत नाही. निक्की तांबोळी हिंदी बिग बॉस करुन आली आहे त्यामुळे ती तसंच खेळते. कदाचित ती करतेय ते बरोबरच असेल कारण मला तो खेळ फारसा कळत नाही. मला जर तिथे ठेवलं तर मी योगितासारखंच म्हणेन, 'बाबा , मला काढा.'

प्रियाने नुकतंच रितेश देशमुखसोबत 'विस्फोट' या हिंदी सिनेमात काम केलं. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. यातील प्रियाच्या अभिनयाचं कौतुक झालं. आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: Priya Bapat reaction on Bigg Boss marathi season 5 reveals who is her favourite contestant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.