प्रिया रैना आणि आर जे मंत्रा तब्बल सहा वर्षांनी एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 12:39 PM2017-03-23T12:39:31+5:302017-03-23T18:09:31+5:30
‘हर मर्द का दर्द’ मालिकेच्या सेटवर प्रिया रैना आणि आर जे मंत्रा हे तब्बल सहा वर्षांनी एकत्र आले आहेत. ...
‘ र मर्द का दर्द’ मालिकेच्या सेटवर प्रिया रैना आणि आर जे मंत्रा हे तब्बल सहा वर्षांनी एकत्र आले आहेत. या मालिकेत फैझल रशीद आणि झिनल बेलाणी हे नायक-नायिकेच्या भूमिकेत आहेत. या मालिकेत फैझल रशीद आणि झिनल बेलाणी हे नायक-नायिकेच्या भूमिकेत आहेत. प्रिया रैना आणि आर जे मंत्रा यांनी यापूर्वी कॉमेडी सर्कस या विनोदी मालिकेत एकत्र काम केले होते. आता ते ‘हर मर्द का दर्द’ या नव्या विनोदी मालिकेत पुन्हा एकत्र आले आहेत. हे दोघेही एकमेकांचे ब-याच वर्षांपासून मित्र असून आता ते या मालिकेत एकत्र भूमिका साकारणार आहेत. या दोघांनीही पूर्वी आर जे म्हणून काम केले होते.या मालिकेत प्रियाने मिस रस्तोगी या नव्या प्राध्यापिकेची भूमिका साकारली असून ती विनोदच्या कॉलेजची उपप्राचार्या झालेली असते. तर मंत्राने जिग्गी या विनोदची पत्नी सोनूच्या जिगरी दोस्ताची भूमिका साकारली आहे.मंत्राबरोबर एकत्र काम करण्याबाबत प्रिया म्हणाली, “आम्ही दोघे सेटवर एकत्र आल्यावर तिथे एकच गोंधळ उडाला.मंत्रा हा अतिशय गुणी कलाकार असून त्याच्याबरोबर काम करताना खूपच मजा येते. तो सर्वांच्यातील सर्वोत्कृष्ट गुम अचूक बाहेर काढतो.आम्ही दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र असून त्याच्याबरोबर काम करताना मला खूप छान वाटतं. आम्ही दोघे शेवटचे एकत्र आलो होतो तेव्हा तिथे आम्ही धमाल केली होती.आता त्याचीच पुनरावृत्ती इथेही होईल, असं वाटतं.”