2017 मध्ये टिव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत हे कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 05:13 PM2017-01-03T17:13:58+5:302017-01-03T17:13:58+5:30
चंद्रकांता, वो अपना सा, गुलाम, दिल से दिल तक, पेशवा बाजीराव, दिल है हिंदुस्तानी, रायजिंग स्टार, मेरी दुर्गा, अग्निफेरा यांसारख्या मालिका 2017मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
2016 मध्ये बिग बॉस, झलक दिखला जा यांसारख्या प्रसिद्ध कार्यक्रमांनाही प्रेक्षकांचे मन जिंकता आले नाही. 2017मध्येदेखील अनेक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पाहूयात कोणकोणते कार्यक्रम 2017मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
चंद्रकांता
नव्वदीच्या दशकात चंद्रकांता ही मालिका खूपच गाजली होती. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लाइफ ओके आणि कलर्स अशा दोन वाहिन्यांवर ही मालिका दाखवली जाणार असून लाइफ ओकेच्या मालिकेची निर्मिती निखिल सिन्हा करत आहेत. निखिलने सिया के राम या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. कलर्सवरील चंद्रकांतामध्ये ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
वो अपना सा
वो अपना सा या मालिकेद्वारे रिधी डोंगरा आणि दिशा परमार छोट्या पडद्यावर परतणार आहे. वी आर फॅमिली या चित्रपटावर आधारित ही मालिका असून या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्राच या मालिकेची निर्मिती करणार आहेत. या मालिकेत सुदीप साहिर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
गुलाम
नागार्जुन या मालिकेच्या जागी गुलाम ही मालिका येणार असून उत्तर भारतातील काही वाईट गोष्टींवर या मालिकेद्वारे प्रकाशझोत टाकला जाणार आहे. या मालिकेत निती टेलर आणि परम सिंग प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. बंदुकाच्या जोरावर कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात आणि लोकांना कशाप्रकारे गुलाम बनवले जाते हे आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
दिल से दिल तक
बिग बॉस 10 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यानंतर सलमान खानच्याच चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटावर आधारित दिल से दिल तक ही मालिका येणार आहे. सरोगसीवर भाष्य करणाऱ्या या मालिकेत रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, जास्मिन भसिनसारखी तगडी स्टारकास्ट असणार आहे. दिया और बातीसारख्या प्रसिद्ध मालिकेची निर्मिती केलेल्या शशी सुमीत मित्तल प्रोडक्शनची ही मालिका आहे.
पेशवा बाजीराव
बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या यशानंतर बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यार आधारित पेशवा बाजीराव ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मनिष वाधवा, अनुजा साठे यांसारखे कलाकार या मालिकेत झळकणार आहेत.
दिल है हिंदुस्तानी
गायनाचे रिअॅलिटी शो सध्या छोट्या पडद्यावर अनेक सुरू आहेत. दिल है हिंदुस्तानी हा एक आणखी सिंगिंग रिअॅलिटी शो 2017मध्ये स्टार प्लस वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात करण जोहर, बादशहा, शाल्मली खोलगडे, शेखर परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत.
रायजिंग स्टार
कलर्स वाहिनीवर रायजिंग स्टार हा सिंगिंग रिअॅलिटी शो लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमात शंकर महादेवन आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
मेरी दुर्गा
हरयाणामधील एक कथा मेरी दुर्गा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आपल्या गरीब वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका मुलीची कथा दाखवली जाणार आहे.
अग्निफेरा
अंकित गेरा आणि युक्ती कपूर यांची अग्निफेरा या मालिकेत प्रमुख भूमिका असणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी राज यांची ही मालिका असून ही झी टिव्हीवर दाखवली जाणार आहे. ब्रम्हराक्षस या मालिकेची अग्निफेरा ही मालिका जागा घेणार आहे.