​हर मर्द को दर्द या मालिकेच्या प्रमोशनचा आगळा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 05:11 AM2017-01-30T05:11:53+5:302017-01-30T10:41:53+5:30

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, दिलजले यांसारख्या चित्रपटात परमीत सेठीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बदमाश कंपनी या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन ...

The promotion of promotion of the series of pain and sorrows to every man | ​हर मर्द को दर्द या मालिकेच्या प्रमोशनचा आगळा फंडा

​हर मर्द को दर्द या मालिकेच्या प्रमोशनचा आगळा फंडा

googlenewsNext
लवाले दुल्हनिया ले जाएंगे, दिलजले यांसारख्या चित्रपटात परमीत सेठीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बदमाश कंपनी या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते आणि आता हर मर्द को दर्द या मालिकेचे तो दिग्दर्शन करणार आहे. कोणत्याही मालिकेचे दिग्दर्शन करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. या मालिकेच्यानिमित्ताने लेखक चेतन भगत आणि या मालिकेचा नायक फैजल रशिद यांनी गाईट टू अंडरस्टॅडिंग वुमन हे पुस्तक प्रकाशित केले आहे. स्त्रिया नक्की काय विचार करतात आणि त्यांना काय हवे असते असा प्रश्न आजवर सगळ्या पुरुषांना पडलेला आहे. या पुस्तकामधून या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील असे या पुस्तकाचे लेखक चेतन भगत यांचे म्हणणे आहे. हे पुस्तक देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करणार आहे. या पुस्तकाद्वारे पुरुष आणि स्त्रियांना त्यांची मते मांडता येणार आहेत. या मालिकेविषयी फैजल सांगतो, "या मालिकेची कथा ही खूप वेगळी असली तरी प्रत्येकाला ही आपलीसी वाटणारी आहे. स्त्रियांना समजून घेणे हे कठीण असते असे म्हटले जाते. या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक पुरुषांचे अनुभव आम्ही एकत्रित केले आहेत."  
चेतन भगत यांनी हे पुस्तक स्त्रियांच्या दृष्टीकोनातून लिहिले आहे. ते सांगतात, "स्त्रियांना समजून कशाप्रकारे घ्यायचे यासाठी कोणताच फॉर्म्युला या जगातील पुरुषांकडे नाहीये. माझ्या या पुस्तकात मी 100 महिलांच्या मुलाखती घेतल्या आहेत. इतक्या स्त्रियांशी मी बोललो असलो तरी स्त्रियांना समजून घेण्यासाठी अजून काम करण्याची गरज आहे असे मला वाटते."
कोणत्याही मालिकेसाठी त्याचे प्रमोशन हे महत्त्वाचे असते. हर मर्द को दर्द या मालिकेच्या टीमने या मालिकेच्या विषयाशी निगडित पुस्तक लिहून खूपच चांगल्या आणि हटके पद्धतीने या मालिकेचे प्रमोशन केले आहे. 

Web Title: The promotion of promotion of the series of pain and sorrows to every man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.