मानसच्या आठवणीतील गाणी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 04:14 AM2018-04-24T04:14:59+5:302018-04-24T09:44:59+5:30
प्रेमाच्या एक ना अनेक परिभाषा उलगडवत, मानस (यशोमान आपटे) आणि वैदेही (हृता दुर्गुळे) यांच्या नितांत सुंदर प्रेमाचा प्रवास आपल्या ...
प रेमाच्या एक ना अनेक परिभाषा उलगडवत, मानस (यशोमान आपटे) आणि वैदेही (हृता दुर्गुळे) यांच्या नितांत सुंदर प्रेमाचा प्रवास आपल्या मनापर्यंत पोहोचवणारी सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता झी युवावर येणारी एक प्रेमळ मालिका म्हणजे "फुलपाखरू". एका नाजूक प्रेमकथेवर आधारित फुलपाखरू या मालिकेमध्ये मानस - वैदेही या प्रेमीयुगुलांच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी याआधी कथानकामध्ये श्रवणीय गाण्यांचा समावेश केला आणि प्रेक्षकांनी त्या गाण्यांना भरपूर पसंत देखील केलं. ही सर्व गाणी मानस म्हणजेच यशोमान आपटे याने स्वतः गायली आहेत. गाण्याची आणि एकंदरीत संगीताची आवड असलेला यशोमान ने सोशल मीडिया वर एक नवीन गोष्ट सुरु केली आहे, "आठवणीतील गाणी "
संगीत अर्थात सूर...लय आणि ताल यांचा सुरेख संगम. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संगीत व्यापून राहिले आहे. किंबहुना माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक भावना तो संगीताच्या सोबतीने अनुभवतो...जगतो. एखाद्या गाण्याचे स्वर, शब्द, त्यातील अर्थ जीवनाच्या कित्येक वळणावर अनुभूतींची शिदोरी देतो. आठवणीतील गाणी ही प्रत्येकाच्या मनात असतात. काहीजण ती त्यांच्या कॉम्प्युटरच्या हार्डडिस्क मध्ये ठेवतात तर काही त्यांच्या मोबाईल मध्ये तो एक फोल्डर जपून ठेवतात. आणि यशोमान सारखी काही मंडळी असतात जी स्वतः त्यांना आवडलेली अशी आठवणीतील गाणी गाऊन आयुष्यात काहीतरी नवीन प्रयत्न करतात. यशोमान ने सध्या २ गाणी गाऊन ही आठवणीतील गाण्याची सिरीज सुरु केली आहे. मराठी गाणं ... आणि हिंदी गाणं म्हणजे "लाल इश्क " ही गाणी गाण्याअगोदर त्याने या गाण्यांची जुजबी माहिती आणि ही गाणी त्याला का आवडतात हे सुद्धा सांगितली आहे.ही नवीन सिरीज त्याने केवळ त्याच्या फॅन्स साठी सुरु केले आहे हे त्याने त्याच्या व्हिडीओ मध्ये सुद्धा नमूद केले आहे .