On public demand!'जीजाजी छत पर है' मालिकेचे पुनरागमन, हटके असणार कलाकारांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 17:15 IST2021-02-19T17:12:58+5:302021-02-19T17:15:32+5:30
अनुप उपाध्याय जल्दीराम स्वीट्सचा मालक जल्दीरामच्या भूमिकेत दिसणार आहे, तर बडबडी, पण उत्साही सोमा राठोड जल्दीरामची पत्नी सोफियाच्या भूमिकेत दिसणार आहे.

On public demand!'जीजाजी छत पर है' मालिकेचे पुनरागमन, हटके असणार कलाकारांचा अंदाज
विनोदी विलक्षणतेसह सर्वांच्या आवडत्या पात्रांना घेऊन येत आहे मालिका 'जीजाजी छत पर कोई है', जी लवकरच टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. नवीन पटकथा व अद्वितीय पात्रांसह मालिका प्रेक्षकांना दिल्लीच्या पंजाबी बागमधील जिंदाल व जल्दीरामच्या विश्वामध्ये घेऊन जाईल. जिंदाल व जल्दीराम कुटुंबाच्या जुन्या संपत्तीच्या वादावर आधारित ही मालिका या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये असलेल्या रहस्यमय घटकासह ट्विस्ट सादर करते. वादाचे आणखी एक कारण म्हणजे दोन्ही कुटुंबांचे संबंधित व्यवसाय, ते म्हणजे जल्दीरामचे मिठाईचे दुकान आणि जिंदालचे गॅरेज. ही दोन्ही दुकान त्यांच्या घराच्या अंगणाच्या समोरासमोर आहेत.
प्रेक्षकांना हास्याच्या राइडवर घेऊन जात आणि मालिकेच्या विलक्षणता व उत्साहामध्ये भर करत आहे मोहक हिबा नवाब, जी जल्दीरामची मुलगी सीपीच्या (कॅनॉट प्लेसचे संक्षिप्त रूप) भूमिकेत दिसेल. सोनी सबचा नवीन जीजाजी ऊर्फ जितेंद्र जामवंत जिंदालची भूमिका साकारणार आहे धडाकेबाज शुभाशिष झा. पारंपारिक आवडते पात्र देखील या जीजाजी फ्रँचायझीसोबत पुनरागमन करत आहेत. अनुप उपाध्याय जल्दीराम स्वीट्सचा मालक जल्दीरामच्या भूमिकेत दिसणार आहे, तर बडबडी, पण उत्साही सोमा राठोड जल्दीरामची पत्नी सोफियाच्या भूमिकेत दिसणार आहे.
जल्दीरामचा वकिल असण्यासोबत सोफियाचा भाऊ असलेल्या चक्रालची भूमिका फिरोज खान साकारणार आहे. अत्यंत मोहक राशी बावा जल्दीराम स्वीट्समधील वेट्रेस सुनिताची भूमिका साकारणार आहे. या स्टार कलाकारांमध्ये काही नवीन चेहरे देखील असणार आहेत जसे जीजाजीचे वडिल नन्हेच्या भूमिकेत जितू शिवहरे, बिजलीदेवी ऊर्फ जीजाजीच्या आईच्या भूमिकेत सुचेता खन्ना आणि जिंदालचा दत्तक घेतलेला मुलगा व जीजाजीचा जिवलग मित्र गुलजारच्या भूमिकेत विपीन. जिंदाल्ससाठी केस लढणार आहे वडिल-मुलाची जोडी ध्यानचंद व विज्ञानचंद. या भूमिका अनुक्रमे नागिन वाडेल व सुमित अरोरा साकारणार आहेत.