Pulwama Attack: नवज्योत सिंग सिद्धूची 'कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 14:13 IST2019-02-16T14:12:44+5:302019-02-16T14:13:12+5:30
नवज्योत सिंग सिद्धू सध्या कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिला होता.

Pulwama Attack: नवज्योत सिंग सिद्धूची 'कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी
‘दहशतवादाला धर्म, देश नसतो पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा’ अशी मवाळ भाषा वापरत पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकरी संतापले होते. नवज्योत सिंग सिद्धू सध्या कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिला होता. अखेर कपिल शर्मा शोमधून सिद्धू यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धू यांच्या जागी अर्चना पूरण सिंह या शोची नवीन परिक्षक असरणार आहे. खुद्द अर्चनानेच या बाबतचे ट्वीट करत माहिती दिली आहे.
#ArchanaPuranSingh shooting for #TheKapilSharmaShow with our superstar #KrushnaAbhishek and the entire team.... #TheKapilSharmaShow#KrushnaAbhishek#KingOfComedy#ShootDairies@apshaha@Krushna_KAS@kikusharda@bharti_lalli@KapilSharmaK9@SonyTVpic.twitter.com/xUbLCnLwIp
— Krushna Abhishek FanClub (@Krushna_KASFans) February 11, 2019