लाडका भक्त पुंडलिकच विठुमाऊलीला देणार युद्धासाठी आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 04:03 PM2019-01-02T16:03:32+5:302019-01-02T16:05:23+5:30

भक्तीपुढे आता पुंडलिकाला ही अमानवी शक्ती श्रेष्ठ वाटू लागली. याच अहंकारापोटी आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या नादात त्याने साक्षात विठु रायालाच युद्धासाठी आव्हान दिले आहे.

Pundalik Vitumauli will challenge for a war in Vitthumauli Serial | लाडका भक्त पुंडलिकच विठुमाऊलीला देणार युद्धासाठी आव्हान

लाडका भक्त पुंडलिकच विठुमाऊलीला देणार युद्धासाठी आव्हान

googlenewsNext
ठळक मुद्देपुंडलिकला अमानवी शक्ती वाटतेय श्रेष्ठपुंडलिकने विठ्ठलाला दिले युद्धाचे आव्हान


पुंडलिक हा विठुरायाचा लाडका भक्त. पुंडलिकाच्या प्रत्येक अडचणीत विठुराया त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. मात्र आता पुंडलिकाला विठ्ठलाच्या भक्तीचा विसर पडला आहे. कलीच्या नकारात्मक शक्तींचा बळी ठरलेल्या पुंडलिकाने अघोरी विद्या संपादन केली आहे. ज्याद्वारे मानवी शरीरातील सात चक्रांवर त्याने विजय मिळवला आहे. भक्तीपुढे आता पुंडलिकाला ही अमानवी शक्ती श्रेष्ठ वाटू लागली. याच अहंकारापोटी आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या नादात त्याने साक्षात विठु रायालाच युद्धासाठी आव्हान दिले आहे.

दिशाहीन झालेल्या पुंडलिकाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी विठुमाऊली कोणता मार्ग अवलंबणार? पुंडलिकाचे गर्वहरण कसे होणार? कलीच्या या दुष्टचक्रातून पुंडलिक बाहेर कसा पडणार? याची रंजक कथा ‘विठुमाऊली’च्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल. दीड तासांचा हा महाएपिसोड असणार आहे. या महाएपिसोडच्या निमित्ताने विठुरायाच्या दिव्यत्वाची प्रचिती प्रेक्षकांना घेता येणार आहे.
‘विठुमाऊली’ या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पाहायला गेल्या एक वर्षापासून मिळत आहे. संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचे माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचे वेगळेपण आहे. या आधी ही या आधी ही कोठारे व्हिजनने जय मल्हार, मन उधाण वाऱ्याचे, गणपती बाप्पा मोरया अशा अनेक प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत.
विठुमाऊली मालिकेचा महाएपिसोड रविवार ६ डिसेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Pundalik Vitumauli will challenge for a war in Vitthumauli Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.