"भाऊ, तुमच्या छत्रछायेत लहानाची मोठी झाले"; गिरीश बापटांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्री भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:30 PM2023-03-29T14:30:14+5:302023-03-29T14:32:06+5:30

Girish Bapat And Ruchita Jadhav : मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश बापट यांना पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

Pune BJP MP Girish Bapat passes away marathi actress Ruchita Jadhav emotional post | "भाऊ, तुमच्या छत्रछायेत लहानाची मोठी झाले"; गिरीश बापटांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्री भावूक

"भाऊ, तुमच्या छत्रछायेत लहानाची मोठी झाले"; गिरीश बापटांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्री भावूक

googlenewsNext

पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती. ते शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 

पंतप्रधान मोदींसह अनेक राजकीय नेत्यांनी गिरीश बापट यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने (Ruchita Jadhav) गिरीश बापट यांना पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. रुचिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गिरीश बापट यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. "भाऊ.. तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले..." असं म्हणत अभिनेत्री गिरीश बापट यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

"भाऊ.. तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले... आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही.. वडीलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार... तुम्हाला विसरणे तर शक्यच नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ" असं रुचिता जाधवने म्हटलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांनी तरुणपणी टेल्को कंपनीत काम केले होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढाही दिला होता. 

आणीबाणीनंतर गिरीश बापटांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८३ मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीत ते नगरसेवक झाले. सलग तीन वेळा बापट नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.
 

Web Title: Pune BJP MP Girish Bapat passes away marathi actress Ruchita Jadhav emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.