​प्यूमोरी मेहता आणि निधी उत्तम यांची एक था राजा एक थी राणी या मालिकेत होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2017 08:54 AM2017-05-11T08:54:08+5:302017-05-11T14:24:08+5:30

एक था राजा एक थी राणी या मालिकेत प्रेक्षकांना दोन नवीन एंट्री पाहायला मिळणार आहेत. छोट्या पडद्यावरचे दोन प्रसिद्ध ...

Purey Mehta and Nidhi Uttam were one of the Raja Ek Tha Rani to be signed in this series | ​प्यूमोरी मेहता आणि निधी उत्तम यांची एक था राजा एक थी राणी या मालिकेत होणार एंट्री

​प्यूमोरी मेहता आणि निधी उत्तम यांची एक था राजा एक थी राणी या मालिकेत होणार एंट्री

googlenewsNext
था राजा एक थी राणी या मालिकेत प्रेक्षकांना दोन नवीन एंट्री पाहायला मिळणार आहेत. छोट्या पडद्यावरचे दोन प्रसिद्ध कलाकार आता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हे दोन्ही कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 
एक था राजा एक थी राणी या मालिकेत सध्या इशा सिंग, अनिता राज, सरताज गिल यांसारखे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या सगळ्यांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. आता प्यूमोरी मेहता या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ती या मालिकेत राजा म्हणजेच सरताज गिलच्या आईच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर राजाच्या बहिणीच्या भूमिकेत निधी उत्तम दिसणार आहे. निधी उत्तम या मालिकेत एका मानसिक रुग्णाची भूमिका साकारणार आहे. निधीने साकारलेल्या भूमिकांमध्ये ही खूप वेगळी भूमिका आहे.
एक था राजा एक थी राणी या मालिकेतील भूमिकेविषयी प्यूमोरी मेहता सांगते, या मालिकेत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. या मालिकेत मी राजाच्या आईची भूमिका साकारत असून आयुष्यात कितीही संकटे आली तरी ती सकारात्मक राहाते. प्रत्येक संकटाचा ती धीराने सामना करते. आपल्या भूमिकेविषयी निधी सांगते, या मालिकेतील माझे सहकलाकार खूप चांगले असल्याने मला काम करायला खूप मजा येत आहे. या मालिकेत मी एका मानसिक रुग्णाची भूमिका साकारत असल्याने ही भूमिका आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांमध्ये आव्हानात्मक भूमिका आहे. 

Web Title: Purey Mehta and Nidhi Uttam were one of the Raja Ek Tha Rani to be signed in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.