आळंदीचे किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर, 'रामकृष्ण हरी' म्हणत घेतला घराचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 10:38 PM2024-08-04T22:38:52+5:302024-08-04T22:40:27+5:30

बिग बॉस मराठीमध्ये आज पहिलं एलिमिनेशन झालं असून पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर गेले आहेत (bigg boss marathi 5)

Purushottam Dada Patil eliminate from bigg boss marathi 5 colors marathi riteish deshmukh | आळंदीचे किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर, 'रामकृष्ण हरी' म्हणत घेतला घराचा निरोप

आळंदीचे किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर, 'रामकृष्ण हरी' म्हणत घेतला घराचा निरोप

'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमधील आज पहिलं एलिमिनेशन पार पडलं. यामध्ये किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर गेले आहेत. या आठवड्यात वर्षा उसगावकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि पुरुषोत्तम दादा पाटील नॉमिनेटेड होते. यापैकी पहिल्याच आठड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांना घराबाहेर जावं लागलं आहे.  

पुरुषोत्तम दादांना निरोप देताना छोटा पुढारी रडला

पुरुषोत्तम दादा आणि धनंजय पोवार हे सदस्य बॉटम २ मध्ये होते. शेवटी पुरुषोत्तम दादांना घराबाहेर जावं लागलंय. पुरुषोत्तम यांनी निघताना रामकृष्ण हरीचा जयघोष केला. पुरुषोत्तम यांना निरोप देताना छोटा पुढारी ढसाढसा रडला. छोटा पुढारी अर्थात घनःश्यामने मिठी मारून रडत रडतच पुरुषोत्तम दादांना निरोप दिला. पुरुषोत्तम यांनी जाताना दोन स्पर्धकांची नावं घेतली. त्यापैकी अभिजीत सावंत त्यांना स्ट्रॉंग स्पर्धक वाटतो तर सूरज चव्हाण त्यांना वीक स्पर्धक वाटतो.


पुरुषोत्तम दादा बाहेर पडताना काय म्हणाले?

'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले,"बिग बॉस मराठीचा एक वेगळा अनुभव घेऊन आलोय. माझं काही चुकलं असल्याचं मला वाटत नाही. घरामधला वावर कसा करायचा हे समजता समजता बाहेर आलोय. 'बिग बॉस मराठी'चा अनुभव थरारक आहे. स्वत:शी ओळख करून घ्यायची असेल तर मला वाटतं हे घर फार महत्त्वाचं आहे". पुरुषोत्तमदादा पुढे म्हणाले,"बिग बॉस मराठी'च्या घरात एखाद्या गोष्टीला प्रतिकार करायला मला जमलं नाही. तरी जिथे नडता 
आलं तिथे नडलो. यापुढे घरातील इतर सदस्य मित्रांमध्ये मी मला पाहील. 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन अभिजीत सावंत जिंकू शकतो. तर सूरज चव्हाण या सीझनमधील वीक खेळाडू आहे".


कोण आहेत पुरुषोत्तम दादा पाटील?

पुरुषोत्तम दादा पाटील  हे मठाधिपती असून ते आळंदीतील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत.  किर्तनात नाचतात म्हणून पुरुषोत्तम दादा पाटील यांना सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागलं. पुरुषोत्तम दादा पाटील हे त्यांच्या एका आठवड्यात घरात तितकेसे बोलताना दिसले नाहीत. त्यांनी नॉमिनेशनवेळी अरबाज पाटीलवर आवाज उठवला. परंतु त्याव्यतिरिक्त ते घरात शांत शांतच दिसले, असं घरातील इतर स्पर्धकांचं म्हणणं आहे.

Web Title: Purushottam Dada Patil eliminate from bigg boss marathi 5 colors marathi riteish deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.