राशीला ब्‍लॅकमेलपासून वाचवण्‍यासाठी पुष्‍पाने लढवली अनोखी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 05:12 PM2022-07-21T17:12:02+5:302022-07-21T17:12:12+5:30

आर्यन त्‍याला नकार देण्‍यासाठी सूड म्‍हणून राशीला ब्‍लॅकमेल करण्‍यासाठी या फोटोचा वापर करतो. हा फोटो व्‍हायरल होऊन कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने घाबरलेली राशी यामधून मार्ग काढण्‍यासाठी त्‍याच्‍यासोबत बोलण्‍याचा प्रयत्‍न करते.

Pushpa’s protective instincts kick-in to protect Rashi from blackmail in Sony SAB’s Pushpa Impossible | राशीला ब्‍लॅकमेलपासून वाचवण्‍यासाठी पुष्‍पाने लढवली अनोखी शक्कल

राशीला ब्‍लॅकमेलपासून वाचवण्‍यासाठी पुष्‍पाने लढवली अनोखी शक्कल

googlenewsNext

पुष्‍पाने मालिका सुरू झाल्‍यापासून प्रेक्षकांचे हृदय व मनामध्‍ये स्‍थान मिळवले आहे. सध्‍या आपल्‍याला पाहायला मिळत आहे की, पुष्‍पाची सर्वात लहान मुलगी राशी समस्‍यांच्‍या जाळ्यामध्‍ये अडकते. तरीदेखील पुष्‍पा तिच्‍या मुलीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि तिला या संकटामधून बाहेर काढते.आपल्‍या कुटुंबापासून लपत राशी गुपचूप एका पार्टीला जाते. तिला माहित नसते की आर्यन तिचा पाठलाग करत आहे आणि तो तिच्‍या हातामध्‍ये बीअरची बॉटल असलेला फोटो काढतो. 

आर्यन त्‍याला नकार देण्‍यासाठी सूड म्‍हणून राशीला ब्‍लॅकमेल करण्‍यासाठी या फोटोचा वापर करतो. हा फोटो व्‍हायरल होऊन कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने घाबरलेली राशी यामधून मार्ग काढण्‍यासाठी त्‍याच्‍यासोबत बोलण्‍याचा प्रयत्‍न करते. फोटो डिलीट करण्‍यासाठी त्‍याचे मन वळवण्‍यामध्‍ये अयशस्‍वी ठरल्‍यामुळे तिला वाटते की, त्‍याला नकार देण्‍याची परतफेड म्‍हणून शाळा बुडवून त्‍याला भेटण्‍याची त्‍याची मागणी मान्‍य करण्‍याशिवाय तिच्‍याकडे दुसरा पर्याय नाही.पुष्‍पा तिच्‍या किशोरवयीन मुलीला ब्‍लॅकमेल केले जात असल्‍याचे समजल्‍यानंतर काय करेल आणि ती या स्थितीचा सामना कशाप्रकारे करेल? हे पाहणे रंजक असणार आहे.

राशीची भूमिका साकारणारी देश्‍ना दुगड म्‍हणाली, ''पाठलाग करून संमतीशिवाय फोटो काढणे आणि ब्‍लॅकमेल करणे हा गुन्‍हा आहे,  अनेकजण या समस्‍यांचा सामना करण्‍यासोबत शांतपणे त्‍या समस्‍या सहन करत असल्‍याबाबत दुस-यांना सांगत नाहीत. पीडितांसाठी हे अत्‍यंत त्रासदायक असू शकते. मालिकेमध्‍ये राशी शांतपणे हे सर्व सहन करत आहे आणि एकटी समस्‍येचा सामना करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे, जे अत्‍यंत सामान्‍य आहे, पण पीडितांचे दुर्दैवी वर्तन आहे. मी आशा करते की, आमच्‍या मालिकेच्‍या माध्‍यमातून आम्‍ही पीडितांना धैर्याने समस्‍येचा सामना करण्‍यास आणि त्‍यांचे मित्र व कुटुंबियांना समस्‍येबाबत सांगून त्‍यांच्‍या मदतीने समस्‍येचे निराकरण करण्‍यास प्रेरित करू.''

याबाबत पुष्‍पाची भूमिका साकारणा-या करूणा पांडे म्‍हणाल्‍या, ''अशा गुन्‍ह्यांचा पीडितांसोबत त्‍यांच्‍या अवतीभोवती असलेल्‍या व्‍यक्‍तींवर देखील परिणाम होतो.  अशा स्थितींमध्‍ये त्‍यांनी त्‍यांच्‍या प्रियजनांना याबाबत सांगण्‍यासोबत पोलिसांकडे त्‍याची तक्रार करणे देखील महत्त्वाचे आहे. असे न केल्‍यास असे गुन्‍हे करणा-या गुन्‍हेगारांचा आत्‍मविश्‍वास वाढत जातो. तसेच तुम्‍हाला कधीच समजणार नाही की तुम्‍ही थांबवण्‍याचा प्रयत्‍न केला नाही तर अशा गुन्‍ह्यांना अजून किती बळी पडतील. म्‍हणून कृपया तुम्‍ही ब्‍लॅकमेल, पाठलाग करणे किंवा अशा कोणत्‍याही गुन्‍ह्यांचे पीडित असाल तर शांतपणे ते सहन करू नका आणि लढा देण्‍यास घाबरू नका.''   

Web Title: Pushpa’s protective instincts kick-in to protect Rashi from blackmail in Sony SAB’s Pushpa Impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.